मुंबई : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी प्रत्येक वळणावर आपल्याला सदैव साद घालत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं आणि त्या पहिल्या नजरेचा, पहिल्या स्पर्शाचा भास होतो. असंच काहीसं झालंय गायिका केतकी माटेगावकर आणि गायक ऋषिकेश रानडे यांच्या बाबतीतही पण... 'पाहिले मी तुला' या मराठी प्रेमपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी. 'पाहिले मी तुला' या आगामी मराठी चित्रपटासाठी हे दोन्ही युवा गायक-गायिका एकत्र आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कोटियन करीत आहेत. सुशील पाटील आणि निलेश लोणकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलेल्या 'केलीस तू नेमकी काय जादू... तुझ्या रंगी मी रंगले' या अलवार प्रेमगीताला विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. केतकी आणि ऋषिकेश यांच्या मधुर आवाजाचा स्वरसाज या गीताला लाभला असून नुकतेच याचे गाण्याचं रेकॉर्डिंग संपन्न झाले आहे. 'या गीताची शब्दरचना अप्रतिम असून हे मन:स्पर्शी गीत प्रत्येकाच्या मनाचा नक्की ठाव घेईल', असा विश्वास केतकी आणि ऋषिकेश या गायकांनी व्यक्त केला आहे.
'एन एस के श्री फिल्मस इंटरनॅशनल प्रा.लि.'ची प्रस्तुती असलेल्या 'पाहिले मी तुला' या चित्रपटाची कथा सारंग पवार यांची असून पटकथा आणि संवाद अभय अरुण इनामदार यांनी लिहिले आहेत. छायांकन संजय मिश्रा यांचे आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kangana Ranaut कडून तापसी पन्नूचा 'She-Man' असा उल्लेख; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड, त्यानंतर कंगनाची सारवासारव
- Nawazuddin celebrity reaction | अरे थोडी तरी लाज बाळगा! मालदिवजचे फोटो पोस्ट करणाऱ्या कलाकारांना नवाजुद्दिन सिद्दिकीचे खडे बोल
- स्वर मंगेश...मास्टर दीनानाथ यांच्या स्वरप्रवासातील खास आठवणी एबीपी माझावर
- Maharashtra Coronavirus | कोरोनाबाधितांसाठी रिकामे फ्लॅट, घरं, गाळे स्वखुशीने उपलब्ध करुन द्या, भरत जाधव यांची कळकळीची विनंती