CoronaVirus in Mumbai कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या धर्तीवर राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले. असं असतानाच कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या सर्व प्रयत्नांना आता काही अंशी यश येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत शनिवारी पालिकेनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार 24 तासांत 5888 नवे कोरोनाबाधित आढळले. मागील तीन आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तर, सलग चौथ्या दिवशी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याची बाबही यातून स्पष्ट होत आहे.
बुधवारी मुंबईत 7684, गुरुवारी 7410 आणि शुक्रवारी 7221 नवो कोरोनाबाधित आढळले होते. या नव्या रुग्ण्यांच्या तुनेत दर दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे अधिक होतं. असाच काहीसा आलेश शनिवारीही दिसून आला. शनिवारी तब्बल 8549 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली. ज्यामुळं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 85 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. सध्याच्या घडीला मुंबईत 78785 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून यातूनही कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण अशाच प्रकारे वाढत जाईल अशी प्रशासनाला आशा आहे.
मागील आठवड्यात असणारा रुग्णांचा पॉझिटीव्हिटी रेट हा 18 टक्क्यांहून यावेळी थेट 15 टकक्यांवर आला आहे. कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठीच्या प्रयत्नांना येणारं हे यश सध्या नागरिक, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा देत आहे.
राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचं लक्ष्य
मुंबईत कोरोनाबाधितांबाबतचं काहीसं दिलासादायक चित्र असतानाच राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. पण, त्यातही कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा लक्ष देण्याजोगा ठरत आहे. शनिवारी राज्यात 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.