एक्स्प्लोर

Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? केतकी चितळेची वायफळ बडबड, वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतलाय वाद

Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. तर मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का केतकीचा वायफळ सवाल, केतकीच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Ketaki Chitale On Marathi Language Elite Status: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Marathi Actress Ketki Chitale) आता आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये केतकी चितळेनं थेट मराठी भाषेच्या (Marathi Language) 'अभिजात दर्जा'च्या (Marathi Language Elite Status) मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही तर निव्वळ 'इन्सिक्युरिटी आहे, मराठी बोलणार नाही, न बोलल्यानं भोकं पडतात का? असं केतकी चितळे (Ketki Chitale) म्हणाली आहे. आपल्या विचित्र प्रश्नांनी स्वतः मराठी असूनही केतकीनं वाद निर्माण करत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. 

2024 मध्ये क्रायटेरिया काढला, मी त्याच्या विरोधात आहे, असं म्हणत केतकी चितळेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. केतकीचं म्हणणं आहे की, अभिजात भाषेसाठी हाच मुख्य निकष आहे.आपल्या व्हिडीओमध्ये केतकी चितळेनं म्हटलंय की, "आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे."

...तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या : केतकी चितळे 

"हा जो काही क्रायटेरिया होता तो 2024 मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिक सांगायचं झालं तर, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या...", असं केतकी चितळे म्हणते. 

पुढे बोलताना केतकीनं तिच्या विचार आणखी बोचणाऱ्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केतकी म्हणाली की, "एकाने मला असंही सांगितलं, माझ्या जवळच्या व्यक्तीने; त्याने मला सांगितलं की, हिंदी आणि उर्दूलासुद्धा दर्जा नाहीये. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे." 

"माझं असं झालं की, ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त इंसिक्योरिटी वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे, त्यामुळे इंसिक्योरिटी आणखी वाढते." असं म्हणत तिने मराठी भाषिकांच्या मागणीलाच 'असुरक्षिततेचं' प्रतीक ठरवलं आहे.

मराठी न बोलल्यानं भोकं पडतायत का? : केतकी चितळे 

"मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इंसिक्योरिटी दाखवताय. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.", असं केतकी चितळे म्हणाली. 

दरम्यान, राज्यात आधीच हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळला आहे. मायबोली मराठी भाषेसाठी मराठी माणूस एकवटला असून भाषा टिकवण्यासाठी सगळे एकजुटीनं उभे ठाकले आहेत. अशातच स्वतः मराठी असूनही केतकीनं मराठीबाबत जी मोठी गरळ ओकली आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. 

मराठी भाषेबाबत गरळ ओकणारी केतकी चितळे काय म्हणाली?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'सचिनसोबत माझी कधीच मैत्री नव्हती, त्याच्या...'; अशोक सराफ यांनी सगळंच स्पष्ट केलं

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget