एक्स्प्लोर

कतरिना- विक्कीचं सुपरक्यूट सरप्राईज! बाळाचं नाव शेअर करत दाखवली पहिली झलक; काय अर्थ आहे नावाचा?

त्यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी आणि चाहते आनंद व्यक्त करतायत. 

Vicky Kaushal Katrina Kaif announce baby boy name: बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ 7 नोव्हेंबर 2025 ला आई बाबा झाले. खास पद्धतीने त्या दोघांनीही ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता जवळपास दोन महिन्यानंतर दोघांनीही आपल्या मुलाचं नाव जाहीर केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना कतरिना आणि विकी आपल्या बाळाचे नाव काय ठेवतात याची उत्सुकता होती. दरम्यान, आपल्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत या जोडप्याने बाळाचं नाव ठेवल्याचंही सांगितलं. ही पोस्ट बघता बघता तुफान व्हायरल झाली आहे . त्यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी आणि चाहते आनंद व्यक्त करतायत. 

काय ठेवलंय बाळाचं नाव?

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचे नाव विहान कौशल असं ठेवलंय. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत " आमचा लाडका विहान कौशल .. आमच्या प्रार्थनांना यश मिळालं. त्याच्या येण्यानं आयुष्य सुंदर झालंय. एका क्षणात आमचं संपूर्ण जग बदललंय. मी फक्त कृतज्ञता व्यक्त करेन! " असं लिहित बाळाची सुंदर झलकही चाहत्यांना दाखवलीय. या फोटोमध्ये दोघेही आपल्या बाळाचा हात हातात धरताना दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्राण लिहिलं 'लिटिल बडी ' तर गायिका श्रेया घोषालनं " कतरीना आणि विकी यांचं अभिनंदन ' असं लिहिलंय. अभिनेत्री शिवानी दांडेकरनेही या पोस्टवर रेड हार्ट इमोजी शेअर केलाय.

काय आहे विहान नावाचा अर्थ ?

विहान हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे. या शब्दाचा अर्थ सूर्योदय, पहाट किंवा सकाळचा प्रकाश असा होतो. नव्या प्रवासाची किंवा युगाची सुरुवात असा अर्थही या नावाचा घेतला जातो.

कतरीना आणि विकी यांनी 2021 मध्ये लग्न केलं होतं. गेलं वर्ष विकीच्या आयुष्यात खूप खास ठरलं. एकीकडे छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातही नवीन बाळाच्या आगमनाने दोघेही आनंदी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Sharad Kapoor : 'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
Dipali Sayyed : रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget