एक्स्प्लोर

Katrina Kaif Body Shaming Troll: प्रेग्नेंसीनंतर विकी कौशलसोबत दिसताच कटरिनाचं सोशल मीडियावर प्रचंड 'बॉडी शेमिंग', पहिल्यांदाच मौन सोडत म्हणाली...

मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी कटरिनाच्या बाजूने भूमिका घेत ट्रोलर्सला सुनावलं. यात हृतिक रोशनसह अनेक महिला अभिनेत्रींच्या पोस्ट चर्चेत होत्या. आता खुद्द कटरिना तिच्या पोस्ट प्रेग्नंसीवर व्यक्त झालीय.  

Katrina kaif Body Shaming Trolling: अभिनेत्री कटरिना कैफ (Katrina kaif) सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. बाळ झाल्यानंतर पहिल्यांदाच कटरीना विकी कौशलसोबत गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात दिसली होती. बाळाच्या जन्मानंतर पहिलाच पब्लिक अपिअरन्स असल्यामुळे साहजिकच चाहत्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. अनेकांनी सोशल मिडीयावर तिच्या वाढलेल्या वाजनावरून टीका केली.  कटरिनाचं बरंच बॉडी शेमिंग (Body Shaming) झालं. अनेकांनी तिच्या प्रेग्नंसीआधीचे आणि नंतरच्या फोटोशी तुलना करणाऱ्या पोस्ट केल्या. दरम्यान, मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी कटरिनाच्या बाजूने भूमिका घेत ट्रोलर्सला सुनावलं. यात हृतिक रोशनसह अनेक महिला अभिनेत्रींच्या पोस्ट चर्चेत होत्या. आता खुद्द कटरिना तिच्या पोस्ट प्रेग्नंसीवर व्यक्त झालीय.  

कटरिनावर होणाऱ्या बॉडी शेमिंगवर सोशल मीडियावर टीका 

कटरिनावर होणाऱ्या बॉडी शेमिंगवर सोशल मीडियावर टीकेची राळ उठली आहे. अनेक स्त्री कलाकारांसह पुरुष कलाकारही कटरिनाच्या शरिरावर, प्रेग्नेंसी नंतर वाढलेल्या वजनावर कमेंट करणाऱ्या ट्रॉलर्सला सुनावताना दिसत आहेत. एखाद्या महिलेच्या शरीरावर टिप्पणी करणाऱ्यांवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. एखाद्या महिलेचं वजन किती वाढलं, कमी झालं, त्यांचं वय किती झालं, तुम्ही कशा दिसता तुमच्या शरीर कसा आहे तुमची त्वचा कशी दिसते याचा हिशोब का द्यावा? आपल्या शरीरावर आपलाच अधिकार असला पाहिजे असं म्हणत अनेकांनी कतरिनाला बॉडी शेम करणाऱ्यांना सुनावलं.

 

दरम्यान, अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत कटरिनाने मातृत्वानंतर तिच्या शरीरात, त्वचेत काय बदल झाले? स्वतःपलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अशा अनेक विषयावर ती व्यक्त झालीय. 'हॉलीवुड रिपोर्टर इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत कटरिना बोलत होती.

गरोदरपणानंतर झालेल्या बदलावर स्पष्टच बोलली कटरिना... 

बॉलीवूडमध्ये आल्यापासून 'सर्वात उत्तम दिसणं' याबद्दलची माझी व्याख्या बरीच बदलली आहे.असं कटरिना कैफने सांगितलं. ती म्हणाली ' गरोदरपणानंतर माझी त्वचा अधिक संवेदनशील झाली होती.माझ्यासाठी तू काळ अतिशय आव्हानात्मक होता.कारण माझ्या त्वचेसाठी कोणती उत्पादन योग्य आहे ते मला शोधून काढावं लागत होतं. मी अशी उत्पादने शोधत होते जी माझ्या त्वचेला शांत करतील. माझ्या त्वचेचा आरोग्य पूर्वीसारखं करण्यास मदत करतील. 

ती म्हणाली, 'जेव्हा मी मॉडलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं, त्यावेळी सौंदर्याचे काही ठराविक निकष होते. पण आता 'उत्तम दिसणं' यापेक्षा ' आतून सर्वात उत्तम वाटणं' याकडे आपण आलो आहोत.आतून छान वाटण्यासाठी मी स्वतःची पूर्णपणे काळजी घेते. ' असं कटरिना म्हणाली.

कटरिना स्वतःची काळजी कशी घेते?

स्वतः ची काळजी घेण्यासाठी कटरिना संतुलित आहार, शरीरातील इन्फ्लमेशन कसं संतुलित ठेवता येईल असा प्रयत्न करते. ऍक्टिव्ह राहणं मेडिटेशन सकाळी एक तास फोन पासून दूर राहणं आणि उठल्या बरोबर नैसर्गिक सूर्यप्रकाशात थांबणं या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप सकारात्मक परिणाम होत असल्याचं ती म्हणाली. याचा प्रभाव माझ्या त्वचेवरही दिसून येतो. जेव्हा तुम्ही आतून निरोगी असतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वातून दिसून येतो. 'असंही तिने सांगितलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Advertisement

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget