Kareena Kapoor On Taimur Ali Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ही (Kareena Kapoor)  सध्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. करीना आणि अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हे सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखती दरम्यान करीनानं तिच्या मुलाबद्दल म्हणजेच तैमूरबद्दल सांगितलं. 


तैमूर हा स्टारकिड असल्यानं अनेक फोटोग्राफर्स त्याचे फोटो काढत असतात. तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका मुलाखतीमध्ये फोटोग्राफर्स आणि त्यांचा मुलांवर होणारा परिणामाबद्दल करीनाला विचारण्यात आलं. यावेळी करीनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 


तैमूर विचारतो हे प्रश्न 
मुलाखतीमध्ये करीना म्हणाली, 'जेव्हा फोटोग्राफर्स फोटो काढतात तेव्हा तैमूरला लक्षात येतं की त्याचे आई-वडील हे फेमस आहेत, तो नाही. तो मला विचारतो की मी फेमस नाहीये तरी लोक माझा फोटो का काढतात?' त्यानंतर मी त्याला सांगते, 'हो तू फेमस नाहीयेस, तू लहान मुलगा आहे. तुला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.'


करीना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे.


करीना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. करीनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा: