Koffee With Karan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला (Koffee With Karan 7) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हे हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ नुकताच करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


करीना उडवणार आमिरची खिल्ली
कॉफी विथ करणाच्या या प्रोमोमध्ये करीना ही आमिरची खिल्ली उडवताना दिसत आहे. करीना प्रोमोमध्ये म्हणते की, अक्षय कुमार 30 दिवसांमध्ये चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो. पण आमिर हा 100 दिवस सिनेमाचं शूटिंग पूर्ण करतो. तसेच करीना आणि आमिर या एपिसोडमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील चर्चे करणार आहेत. प्रोमो व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. कॉफी विथ करणचा हा एपिसोड मजेशीर आणि हटके असणार आहे, अशा कमेंट्स करणनं शेअर केलेल्या प्रोमो व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.  


पाहा प्रोमो:






आमिर आणि करीनाचा आगमी चित्रपट 


आमिर आणि करीनाचा लाला सिंह चड्ढा हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये करीना आणि आमिरसोबतच  नागा चैतन्य, मानव विज,मोना सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18  स्टडियोज  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


हेही वाचा: