11th Admission 2022 : अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या अकरावी प्रवेश (11th Admission 2022 )प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. 25 जुलै पासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरवात झाली तर 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा एकदा सीबीएसई दहावी निकालानंतर सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळाल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत.
पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जातील.
आज सकाळी 10 वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यामध्ये पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जातील. सकाळी 10 ते 6 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेशाची औपचारिकता या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा. जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी प्रोसीड फॉर अॅडमिशनवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.
...तर त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल
जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तो विद्यार्थी पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र पसंती क्रमांक एक नंबरला असलेले कॉलेज विद्यार्थ्याला पहिल्या फेरीत मिळाले असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल अन्यथा त्याला एक प्रवेश फेरी प्रतिबंधित केली जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करून त्यानंतर रद्द करायचा असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल. 7 ऑगस्ट अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील व त्यानंतर दुसरी फेरी आयोजित केली जाईल.
संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल
- 7 ते 17 ऑगस्ट - नियमित दुसरी फेरी
- 18 ते 25 ऑगस्ट - नियमित तिसरी प्रवेश फेरी
- 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर - नियमित प्रवेशाची विशेष फेरी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI