Kareena Kapoor Khan : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही तिच्या एका पुस्तकामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. करिनाने 2021 मध्ये 'Kareena Kapoor Khan Pregnancy Bible' हे तिचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. पण आता याच पुस्तकाने करिनाच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हं आहेत. एका वकिलांनी तिच्या या पुस्तकाच्या नावामध्ये बायबल असा उल्लेख करण्यावर आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे करिनाच्या विरोधात हायकोर्टातही याचिका दाखल करण्यात आली आहे. अशातच करिनाला कोर्टाकडून नोटीस देखील जारी करण्यात आलीये. 


माहितीनुसार, यामुळे करिनाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तिला कोर्टाकडूनही नोटीस जारी करण्यात आल्याने ती कायदाच्या कचाट्यातही सापडली आहे. पुस्तकाच्या नावात बायबल असा उल्लेख केल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे. तसेच आता तिच्याविरोधात खटला उभा करण्याची देखील मागणी करण्यात आलीये.         


कोर्टाकडून करिनाला नोटीस


क्रिस्टोफर एंथनी नावाच्या एका व्यक्तीने करिनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, करिनाने लोकप्रियता मिळवण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यामुळे यावरील बायबल या शब्दाचा वापर हा अत्यंत चुकिचा आहे. एंथोनी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायमूर्ती गुरपाल सिंह अहलूवालिया यांच्या बेंचने करिनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या याचिकेत करिनाचं हे पुस्तक बॅन करण्याची देखील मागणी करण्यात आलीये. त्यामुळे कोर्टाने हे पुस्तक विकणाऱ्या विक्रेत्यांना देखील नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर 1 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


करिनाच्या पुस्तकात नेमकं काय?


करिनाने तिच्या प्रेग्नंसीच्या काळावर हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचप्रमाणे तिने नव्याने आई झालेल्यांसाठी आणि मातृत्वासाठी काही टीप्स देखील तिच्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. यामध्ये आईसाठी डाएट, फिटनेस, सेल्फ केअर आणि नर्सली तयारीच्या टीप्स आहेत. करिना कपूरसोबत आदिती शाह भिंजयानीने हे पुस्तक लिहिलं आहे. 






ही बातमी वाचा : 


Abhijeet Bichukale : सांगलीत संजयकाका जिंकणार, अजितदादांना चार जागा सुद्धा मिळणार नाहीत, अभिजीत बिचुकलेंचे धडाकेबाज अंदाज