Kangana Ranaut Defamation Case : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. यानंतर कंगनानेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात वेगळी वळणं येतं आहेत. आता ‘पंगा क्वीन’ कंगनान न्यायालयाकडे एक विनंती केली आहे. बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिचा जबाब नोंदवण्याची विनंती कंगनानं मुंबई न्यायालयालाकडे केली आहे. 


पीटीआयनं दिलेल्य माहितीनुसार, मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट आर.आर.खान यांना कंगनानं एक अर्ज दिला आहे. कंगनाचा हा अर्ज वकील रिजवान सिद्दीकी यांनी शुक्रवारी (29 जुलै) यांनी दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कंगना न्यायालयासमोर हजर झाली होती.


मार्च 2021 पासून या खटल्याला गैरहजर राहण्यासाठी कंगनानं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत सूट मागितली होती. न्यायालयानं वॉरंट बजावल्यानंतर अखेर 20 सप्टेंबर 2021 रोजी कंगना न्यायालयात हजर राहिली होती. मात्र त्यानंतर कंगनानं अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातील या मानहानीच्या खटल्यादरम्यान हजर राहण्यापासून कायमची सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता.


काय आहे प्रकरण?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याला कंगनाची बहिणी रंगोली चंदेलनही दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कायदेशीर मार्ग स्वीकारत फौजदारी मानहानीचा खटला दाखल होता. 


वाचा इतर बातम्या: