Nirmala Mishra : प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा (Nirmala Mishra) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील राहत्या घरात निर्मला मिश्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. बालाकृष्णा दास पुरस्कारानं निर्मला मिश्रा यांना गौरवण्यात आलं होतं.  रात्री बारा वाजून पाच मिनीटांना निर्मला मिश्रा यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. 


आज होणार अंत्यसंस्कार 
आज (रविवार) निर्मला मिश्रा यांच्या पार्थिवाला रवींद्र सदन येथे नेण्यात येणार आहे. तिथे चाहते आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतात. त्यानंतर कोरताला येथील स्माशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 


बालपणीपासून संगीताची आवड
निर्मला मिश्रा यांचा जन्म 1938 मध्ये  माजिलपूर येथे झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब कोलकाता येथील चेतलामध्ये स्थायिक झाले. निर्मला यांचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. 


प्रसिद्ध गाणी गायली
निर्मला मिश्रा यांनी अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. त्यांच्या ‘ऐमोन एकता झिनुक’, ‘बोलो तो अर्शी’, ‘कागोजेर फूल बोले’, ‘ऐइ बंग्लार माटी टी’आणि ‘आमी तो तोमार’ही गाणी गायली आहेत. त्यांच्या या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ‘तुमी आकाश एकखुन जोडी’ आणि ‘अमी हरिये फेलेची गणेर साथिरे’ या चित्रपटांमधील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. बंगाली चित्रपटांबरोबरच त्यांनी उडिया भाषेतील चित्रपटांमध्ये देखील गाणी गायली. निर्मला मिश्रा यांच्या निधनानं संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. 


हेही वाचा: