Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील  ‘लॉक अप’ (Lock Upp) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  केले . नुकताच या कार्यक्रामाचा ग्रँड फिनाले पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) हा लॉक अप कार्यक्रमाचा विजेता ठरला. या कार्यक्रमाच्या टॉप-6 मध्ये प्रिंस नरूलाचा (Prince Narula) समावेश होता. पण प्रिंस नरुला हा ट्रॉफी जिंकण्यासाठी या शोमध्ये नव्हता, असं कंगनानं ग्रँड फिनालेमध्ये सांगितलं. प्रिंसला लॉक अप कार्यक्रमाची ट्रॉफी मिळाली नाही पण त्याला एक नवा प्रोजेक्ट मिळाला. 


लॉक अपमधील प्रिंसच्या स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेकांना वाटले की प्रिंस हा या शोचा विजेता ठरेल. पण प्रिंस हा ग्रँड फिनालेचा भाग नव्हता असं कंगनानं शोमध्ये सांगितलं. प्रिंस हा स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी झाला नव्हता. तो फक्त उतर स्पर्धकांचे अडथळे वाढवण्यासाठी कार्यक्राचा भाग झाला होता.  बालाजी टेलीफिल्म्सकडून प्रिंसला एका नव्या प्रोजेक्टची ऑफर देण्यात आली आहे. 






विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस
विजेता मुनव्वरला ट्रॉफी व्यतिरिक्त, 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे. काही काळ मुनव्वर अनेक संकटांना सामोरे गेला. 


हेही वाचा :