KFG Chapter 2 : सुपरस्टार यशचा चित्रपट 'केजीएफ 2' (KGF Chapter 2) जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'KGF 2'च्या हिंदी व्हर्जनने नुकताच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केला आहे. आता या चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड कलेक्शननेही रेकॉर्ड केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे जगभरातील कमाईचे आकडे समोर आले आहेत. मार्व्हल स्टुडीओच्या प्रसिद्ध चित्रपटाला मागे टाकत या चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे.


यशच्या 'KGF Chapter 2' या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक  मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर 'KGF 2' च्या कलेक्शनची नवी अपडेट दिली आहे. त्यांनी ट्विट केले की 'KGF 2' ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1104.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


‘केजीएफ 2’चे जगभरातील कलेक्शन


पहिला आठवडा : 720.31 कोटी


दुसरा आठवडा : 223.51 कोटी


तिसरा आठवडा : 140.55 कोटी


चौथा आठवडा (सुरु) : 20.36 कोटी (2 दिवस)


एकूण कलेक्शन : 1104.73 कोटी



‘KGF Chapter 2’ हा चित्रपट आपल्या धडाकेबाज कमाईमुळे सतत चर्चेत असतो. देशातूनच नाही, तर परदेशातूनही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यशची स्टाईल आणि अॅक्शन पाहण्याची क्रेझ लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 24 दिवस झाले आहेत आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये रॉकीची जादू कायम आहे.


सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


‘केजीएफ 2’ने या चित्रपटाने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. KGF 2 हा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. KGF 2 ला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. KGF बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. जगभरात चित्रपटाने 1110 कोटींचा टप्पा पार केला आहे. यशसोबत केजीएफमध्ये रवीना टंडन आणि संजय दत्त दिसले आहेत.


हेही वाचा :