एक्स्प्लोर

Kangana Ranaut On Hrithik Roshan: कंगना रणौतनं हृतिक रोशनला 1439 ईमेल्स पाठवलेले? 'पंगा क्वीन'नं थेट सांगून टाकलं

Kangana Ranaut On Hrithik Roshan: कंगनानं सार्वजनिकरित्या दावा केलेला की, ती आणि हृतिक एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मात्र, हे प्रकरण चांगलंच तापलेलं.

Kangana Ranaut On Hrithik Roshan: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) आणि वाद यांचं नातं काही नवीन नाही. बॉलिवूडची 'पंगा क्वीन' आणि खासदार कंगना राणौत (MP Kangana Ranaut) आपल्या पर्सनल लाईफसोबतच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते. अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडण्यात आलं असलं, तरी हृतिक रोशनसोबतचं (Hrithik Roshan) प्रकरण विशेष गाजलेलं. हृतिक रोशननं कंगनावर आरोप करत सांगितलेलं की, त्याला तिच्या ईमेल आयडीवरून तब्बल 1439 ईमेल्स पाठवण्यात आलेले. याप्रकरणी त्यानं सायबर सेलमध्ये तक्रारही दाखल केली होती. हा वाद तेव्हा पेटला, जेव्हा कंगनानं सार्वजनिकरित्या दावा केलेला की, ती आणि हृतिक एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मात्र, हे प्रकरण चांगलंच तापलेलं. या सगळ्या प्रकरणावर कंगनानं एका मुलाखतीत भाष्य केलेलं. तसेच, तिनं बोलताना सर्वच्या सर्व आरोप फेळालेत. 

हृतिकसोबतच्या ईमेल वादावर काय म्हणाली कंगना रणौत? 

एका मुलाखतीदरम्यान कंगनाला विचारण्यात आलं की, 'क्वीन' सिनेमाच्या यशानंतर पार्टीत तिनं हृतिक रोशनला मेल करून धन्यवाद म्हटलेलं का? यावर कंगनानं स्पष्टपणे नकार देत सांगितलेलं की, "मी त्याला कोणतीही मेल पाठवला नव्हता..." यानंतर तिनं त्या प्रकरणाबद्दल अधिक सांगताना खुलासा केलेला की, तिने हृतिकच्या वडिलांना फोन करून त्यांच्या मुलाच्या वागणुकीबद्दल माहिती दिली होती आणि त्याला समजावण्याची विनंती केली होती. त्यावर त्यांनी सांगितलं की, हृतिकच्या मते त्याचं आणि कंगनाचं काहीही नातं नाही, त्यामुळे हा विषय इथेच संपवावा... त्यानंतर हे प्रकरण तिथेच थांबल्याचं कंगनानं नमूद केलेलं.

हृतिक रोशनसोबतच्या तिच्या कथित प्रेमसंबंधांविषयी विचारलं असता, त्या अभिनेत्रीनं उत्तर दिलेलं की, "हो, माझं त्याच्यावर प्रेम होतं, किंवा जे काही प्रेमसंबंध होता ते, ती काही जबरदस्तीची गोष्ट नव्हती... तो स्वतःच माझ्या वाढदिवसाच्या पार्ट्यांना यायचा आणि जमिनीवर लोळत, अगदी बेभान होऊन नाचायचा..."

"जेव्हा त्यानं 1,439 ईमेल्सचा आकडा सांगितला, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी त्याला फक्त 3 ते 4 पत्रं लिहिली होती. जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि मी न्यूयॉर्कमध्ये होते, तेव्हा आम्ही एकमेकांना अनेक गोष्टी सांगायचो. मला कवितांची आवड असल्याने मी त्याला कविता लिहून पाठवायचे... त्यानं याच पत्रांमधील मजकूर कॉपी-पेस्ट करून खोटा आकडा तयार केला आणि माझा अपमान करण्यासाठी त्याचा गैरवापर केला...", असं कंगनानं सांगितलेलं. 

पुढे बोलताना कंगना रणौत म्हणालेली की, "हो, मी त्याच्यावर प्रेम करत होते. ते नातं जबरदस्तीचं नव्हतं". तिने पुढे सांगितलं की, हृतिकनं तिला स्पष्ट केलं होतं की, तो एका नात्यात आहे आणि सार्वजनिकरित्या तिला स्वीकारू शकत नाही. कंगनानं मुलाखतीत बोलताना असाही दावा केलेला की, हृतिकसोबतच्या घटस्फोटानंतर तिला भविष्यात एकत्र राहण्याबद्दल म्हटलं होतं. मात्र नंतर त्यानं नातं नाकारलं. व्हॅलेंटाईन डेच्या एका प्रसंगाचा उल्लेख करत ती म्हणाली, "मी त्याला फोन का केला नाही असं विचारलं, तर त्याने "मी तुला का फोन करू?" असं उत्तर दिलं. त्या वेळी मला खूप वाईट वाटलं".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut on Chirag Paswan: '..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?

महत्त्वाच्या बातम्या

OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Embed widget