Sanjay Dutt : लवकरच प्रदर्शित होणाऱ्या केजीएफ 2 या चित्रपटामधील संजय दत्तनं (Sanjay Dutt)  भूमिकेची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये तो अधिरा ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कोविड भारतात मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्याचवेळी अभिनेता संजय दत्तच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती.  कॅन्सरवर मात केल्यानंतर संजयने प्रथम केजीएफ 2 (K.G.F: Chapter 2) चे शूटिंग सुरू केले. अशा परिस्थितीत हे करणे किती कठीण होते, याबाबत संजयनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 


संजय  म्हणाला की 'होय, हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही आव्हानात्मक होते. माझ्यावर उपचार सुरू होते, केमोचे सत्र सुरू होते आणि जेव्हा मी क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू केले तेव्हा देखील ते सुरूच होते. त्यातून सुटका नव्हती. तुम्हाला ते करावेच लागते जे तुम्हाला करायचे आहे. मात्र जेव्हा तुमच्या जीवनात रॉक-सॉलिड सपोर्ट सिस्टीम असेल तेव्हा ते करणे सोपे होते. माझ्या कुटुंबाची ताकद आणि उत्कटतेच्या जबाबदारीने मला अभिनयात परत आणण्यासाठी मला मानसिकदृष्ट्या धैर्यवान आणि उत्साही ठेवले. कुटुंब माझी सपोर्ट सिस्टम आहे. मी 'कधीही हार मानू नका' या ब्रीदवाक्यासोबत वाढलो आहे. आज मी कर्करोगमुक्त आहे आणि नॉर्मल आयुष्य जगतो आहे.'


चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयच्या तब्येतीला लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि मेकर्सनी संजय दत्तला बॉडी डबलची मदत घेण्याचा सल्ला दिला, पण संजयने बॉडी डबलशिवाय संपूर्ण सीन स्वत: शूट केला. याविषयी संजय दत्त म्हणतो, "त्यांनी ग्रीन पडद्यावर चित्रीकरण करावं असं सुचवलं होतं. पण एक अभिनेता म्हणून या चित्रपटाचं अचूक शूटिंग करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." अशा प्रकारे अभिनेत्याने संपूर्ण टीमला हाय एनर्जी सीन्स शूटिंगपासून वाचवले. केमोथेरपीनंतर इतक्या अडचणींचा सामना केल्यावर शरीर इतकं अशक्त होतं तरीही, संजय दत्त पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये आला आणि संपूर्ण सीन स्वतः शूट केला. त्यामुळे या अपार परिश्रमाने आपण निश्चितपणे म्हणू शकतो की केजीएफ 2 साठी दत्त हाच खरा तारणहार आहे. 


संजय दत्तकडे अनेक अडचणींचा सामना करून देखील अफाट दृढता आणि सहनशीलता आहे. अभिनेत्याने "मैं आ रहा हूँ अपनी केजीएफ लेने" हे कोणत्या परिस्थिती म्हटले हे सर्वात महत्त्वाचे आहे. दर्शक या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या