kgf chapter 2 : दाक्षिणात्या स्टार यशचा (Yash) केजीएफ-2 (kgf chapter 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यशचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहे. या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 'केजीएफ' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी एक गौप्यस्फोट केला. मुलाखतीमध्ये प्रशांत यांनी त्यांना असलेल्या व्यसनाबद्दल माहिती दिली. 


केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये प्रशांत यांनी दारूच्या व्यसनाबाबत सांगितलं. ते म्हणाले, 'मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो पण तुम्ही मला वचन द्या की या मुलाखतीमधील कोणताच भाग तुम्ही कट करणार नाही.'  


पुढे निल यांनी सांगतिलं, 'मी नेहमी कोणतीही गोष्ट लिहिताना दारू पितो. ' मुलाखतीमध्ये त्यांना विचारला की, 'गोष्ट लिहिताना तुम्ही काय विचार करता?' निल यांनी उत्तर दिले, 'ती गोष्ट कशी मांडली जाते यावर सर्व अवलंबून आहे.' केजीएफ-2 नंतर आता नील यांचा 'सालार' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. केजीएफ-2 चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त  , मालविका अविनाश ,श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 2018 मध्ये आलेल्या केजीएफ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली. केजीएफ चॅप्टरः2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.  विजय किरागंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


संबंधित बातम्या