श्रीनगर : IAS अधिकारी अतहर अमीर खान हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे सहा लाख फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर त्यांना 1.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. अतहर आमीर खान यांनी काल (12 एप्रिल) इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, जो व्हायरल झाला आहे.


इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सुमारे 15 तासांमध्ये 4 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. त्यात मुलींची संख्या जास्त आहे. या फोटोवर शेकडो मुलींनी हार्ट इमोजी पाठवून प्रेमही व्यक्त केले आहे. अनेक मुलींनी त्यांना आपला क्रश म्हटलं आहे. काही मुलींनी असंही लिहिलं आहे की, "कोणी इतके सुंदर कसे असू शकते."






2015 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवणारे अतहर आमीर यांची पोस्टिंग सध्या श्रीनगरमध्ये आहे. आयएएस अतहर आमीर खान यू-ट्यूबवरही खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिले आहेत.




 


यू ट्यूबवर UPSC परीक्षेबाबत टिप्स
एका यूट्यूब व्हिडीओमध्ये अतहर आमीर खान हे यूपीएससी परीक्षेबाबत टिप्स देताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी त्यांची जीवनकथाही सांगितली आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, सर्वप्रथम आपण मोठा विचार केला पाहिजे. नेहमी मोठी स्वप्ने पाहा, स्वप्नांना मर्यादा घालू नका. एखादं काम कितीही मोठं असलं तरी आपण ते का करु शकत नाही, हे नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे.


आयएएस अतहर आमिर खानचा मोठा चाहतावर्ग
आयएएस अतहर खूपच देखणे आहेत. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ते सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी IAS अतहर आमीर खान यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टायलिश फोटो शेअर केला होता. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला होता. 


Athar Aamir Khan : टीना दाबीचा घटस्फोटीत पती, आयएएस अतहर खानची सोशल मीडियावर हवा


टीना दाबीसोबत लग्न आणि घटस्फोट
काश्मीरमधील पहिला आयएएस अधिकारी ठरलेल्या अतहर आमीर खान यांनी 2015 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला होता, तर टीना दाबीने यात अव्वल स्थान पटकावलं होतं.


अतहर आमीर खानने 2018 साली आयएएस टीना दाबीसोबत लग्न केलं होतं. परंतु काही  2020  साली त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दरम्या आयएएस टीना दाबी लवकरच IAS प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.