John Abraham : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या अभिनयाबरोबरच फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो. सध्या 'द कश्मीर फाइल्स' ( The Kashmir Files) या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करत आहेत. पण या चित्रपटाबद्दल जॉननं बोलणं टाळलं आहे.
जॉनचा अटॅक हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या एका इव्हेंटमध्ये जॉनला द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल एका व्यक्तीनं प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला जॉननं उत्तर देणं टाळलं. त्यानंतर तो व्यक्ती सतत त्या चित्रबपटाबाबत प्रश्न विचारत होता. तेव्हा जॉननं त्या व्यक्तीला अटॅक या चित्रबपटाबद्दल प्रश्न विचारण्यास सांगितलं. त्यानंतर जॉन आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू झाला. जॉन म्हणाला, 'तुम्ही मला करंट टॉपिकवर प्रश्न विचारू शकता. मी इथे अटॅक या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलो आहोत. त्या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारा. लोक मला कश्मीर फाइल्सवर का प्रश्न विचारत आहेत? '
जॉनचा अटॅक हा चित्रपट एक एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जॉनसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकलिन फर्नांडिस प्रमुख भूमिका साकारणार आहे.
'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर 'या' पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई
- Happy Birthday Jackie Shroff : कधीकाळी चाळीत राहायचा जॅकी श्रॉफ, ‘अशी’ मिळाली मॉडेलिंगची ऑफर!
- Mika Singh : '... म्हणून मी 20 वर्षात लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या 150 मुलींना नकार दिला'; मिका सिंहनं सांगितलं कारण
- Nawazuddin Siddiqui : लग्झरी कारसोडून मुंबई लोकलमधून प्रवास; 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha