एक्स्प्लोर

'वेड' फेम अभिनेत्री उरकणार साखरपुडा? 'मिस्ट्री मॅन' सोबतचा फोटो शेअर, कॅप्शनमधून सगळंच सांगून टाकलं

Mystery Man in Jia Shankar Life: जिया शंकरचं नाव अभिषेक मल्हानसोबत जोडलं जात होतं. या चर्चांना तिनं पूर्णविराम दिला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Mystery Man in Jia Shankar Life: वेड फेम जिया शंकर सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ती आपले दैनंदिन अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून जिया शंकर  तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  तिचं सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत  नाव जोडलं गेलं होतं.  नंतर अहानच्या टिमनं अफवा असल्याचं सांगितलं. यानंतरही  पुन्हा एकदा जिया शंकर तिच्या लिंकअप्समुळे चर्चेत आली आहे. सध्या जिया शंकरचं नाव अभिषेक मल्हानसोबत जोडलं जात आहे. दोघांमध्ये रिलेशनशिप असल्याची चर्चा आहे. तिला वारंवार या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तिनं आतापर्यंत मौन बाळगलं होतं.  मात्र, आता तिने  या रिलेशनशिपबाबत  खरी माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जिया शंकर आणि प्रसिद्ध यूट्यूबर अभिषेक मल्हान दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती होती. या कपलचं लवकरच  साखरपूडा होणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगली होती.  मात्र,  या चर्चांवर जिया शंकरने पूर्णविराम दिला आहे.  तिनं अलिकडेच  मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला. तसेच  सर्वांनाच सुखद धक्का  दिला. सध्या जियाची ही पोस्ट सोशल  मीडियात व्हायरल होत आहे. जिया शंकरच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅन नेमका कोण? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  जिया आणि अभिषेक  यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते. दोघांमध्ये रिलेशनशिप सुरू आहे का? असा प्रश्न विचारला जात होता.  सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, जिया आणि अभिषेक यांचं अधिकृत असून  ते लवकरच साखरपूडा करणार आहेत, असा दावा करण्यात आला होता.  परंतु,  या चर्चांना जियाने पूर्णविराम दिला आहे.  तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो व्यक्ती जियाच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.  

जिया शर्माची सोशल पोस्ट व्हायरल

या व्यक्तीचा फोटो तिनं इमोजीचा वापर करून लपवला आहे.  या फोटोतून असे स्पष्ट होते की, ती यूट्यूबर अभिषेक मल्हानला नसून दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे. तिनं या फोटोला कॅप्शन दिलं आहे.  'खोट्या अफवांना  2025मध्येच सोडून देऊया'  असं तिनं म्हटलं  आहे. दरम्यान, मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण?  जिया शंकर नेमकं कुणाला डेट करतेय? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget