Jhund : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड (Jhund) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओचा प्रेमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. नागराजच्या आटपाट प्रोडक्शन (Aatpat Production) या प्रोडक्शनव हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर हा मेकिंगचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 


मेकिंगच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, नागराज आणि या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत आहेत. नागराज सर्वांना चित्रपटाचे कथानक सांगत आहे. व्हिडीओनध्ये अमिताभ बच्चन देखील दिसत आहेत. चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांची एन्ट्री होताच लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात. तसेच नागराज त्यांचे स्वागत करतो. मग नगराज 'अॅक्शन', असं म्हणतो आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होते. 



झुंड चित्रपटाचे कथानक हे स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर, रिंकू राजगु आणि सायली पाटील या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर धनुष, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव आणि आमिर खान या अभिनेत्यांनी देखील चित्रपटाचे कौतुक केले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha