एक्स्प्लोर

Jennifer Winget Future Husband William Ishmael: घटस्फोटानं आयुष्य उध्वस्त, 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम, 41व्या वर्षी कोट्याधीश बिझनेसमनसोबत परदेशात थाटणार संसार?

Jennifer Winget Future Husband William Ishmael: सध्या टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजन विश्वात लवकरच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार असून टेलिव्हिजनची सुपरस्टार अभिनेत्री वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. 

Jennifer Winget Future Husband William Ishmael: चाईल्ड अॅक्ट्रेस म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या जेनिफर विंगेट (Jennifer Winget) हिनं पुढे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये (Television Industry) आपला चांगला जम बसवला. तिनं 'कसौटी जिंदगी की' (Kasautii Zindagi Kay) या गाजलेल्या मालिकेत श्वेता तिवारीच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं 'दिल मिल गये', 'बेहद', 'बेपनाह' आणि 'सरस्वतीचंद्र' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. सध्या टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजन विश्वात लवकरच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार असून टेलिव्हिजनची सुपरस्टार अभिनेत्री वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूरस्थित कोट्याधीश बिझनेसमन असलेला तिचा प्रियकर विल्यम इस्माईल याच्याशी लग्न करून ती तिच्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. हा विवाह ख्रिश्चन परंपरेनुसार, पार पडणार आहे. जेनिफरचं हे दुसरं लग्न असणार आहे. जेनिफर विंगेटचं पहिलं लग्न प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर (TV actor Karan Singh Grover) यांच्यासोबत झालं होतं. पण, काही वर्षांतच दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला आणि दोघांचा घटस्फोट झाला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

जेनिफरचा होणारा नवरा कोण? (Who Is Jennifer Winget Husband?)

जेनिफरच्या दुसऱ्या लग्नाची बातमी सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय. तिच्या लग्नाच्या बातमीनं चाहते भलतेच आनंदी झाले आहेत आणि तिला पुन्हा एकदा संसारात स्थिरावताना पाहण्यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत. मात्र, तिचा होणारा जोडीदार नक्की कोण आहे, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. 

हिंदुस्थान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, जेनिफर विंगेट गेल्या काही काळापासून सिंगापूरस्थित व्यावसायिक विल्यम इस्माईलला गुपचूप डेट करत आहे. विल्यम इस्माईल व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचा मनोरंजन क्षेत्राशी कोणताही संबंध नाही. तो फायनांशियल सेक्टरमध्ये कार्यरत आहे. त्याला डिजिटल ॲसेट्स (Digital Assets), प्रशिक्षण आणि परकीय चलन बाजार (Foreign Exchange Markets) या क्षेत्रांचा अनुभव असल्याचं समजतंय. विल्यम प्रसिद्धीच्या झोतात राहणं किंवा माध्यमांच्या नजरेत येणं टाळतो. जेनिफर त्याला भेटण्यासाठी वारंवार सिंगापूरला जाते आणि तिथे ही जोडी कॅमेऱ्यांपासून दूर निवांत वेळ घालवते. अशाच एका भेटीदरम्यान विल्यमनं जेनिफरला लग्नासाठी प्रपोज केलं आणि तिनं त्याचं प्रपोजल स्वीकारलं. आता ही जोडी लग्नाच्या तयारीत व्यस्त असून लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. 

जेनेफर विंगेटचं लग्न कधी? (Jennifer Winget Marry Second Time)

इनसाइडरनं दिलेल्या रिपोर्टनुसार, जेनिफर आणि विल्यम एकत्र खूप आनंदी आहेत. त्यांना आणि त्यांच्या सुंदर नात्याला पाहणं खरोखरंच आनंददायी आहे. व्हेकेशनवेळी विल्यमनं जेनिफरला लग्नासाठी मागणी घातली आणि तिनंही होकार दिला. सध्या दोघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हे लग्न या वर्षीच होणार असलं तरी लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. 

दरम्यान, जेनिफरनं आपल्या लग्नाबाबतच्या या चर्चांना अद्याप दुजोरा दिलेला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, जेनिफरचे यापूर्वी 2012 मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोव्हरसोबत लग्न झालं होतं, पण दोन वर्षांनंतर, म्हणजेच 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. आता जेनिफरच्या दुसऱ्या लग्नाबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jodha Akbar Fame Lavina Tandon On Casting Couch: 'कॉम्प्रोमाइज केलंस तर, 7 लाख मिळतील... नाहीतर...'; 'जोधा अकबर' फेम अभिनेत्रीचा कास्टिंग काउचवर खळबळजनक खुलासा

ABP Majha च्या बातम्या LIVE:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishal Dadlani On PM Modi Video: 'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget