Shah Rukh Khan-Sameer Wankhede Jawan Trailer : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूकमध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ट्रेलर जवानचा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेची रंगली आहे. हा ट्रेलर रिलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत.






त्याला कारण ठरला तो ट्रेलरमधील एक खतरनाक डायलॉग. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो की, 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...'. आता ट्विटवर हा डायलॉग खूपच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी हा संवाद मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी जोडला.


एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग बस्ट प्रकरणात अटक केली होती. तेव्हा या प्रकरणाची खूप चर्चाही झाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.


जवान कधी होणार रिलीज?


जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. काही दिवसांपूर्वी  सेन्सॉर बोर्डानं जवान या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. जवान  या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. . हा चित्रपट शाहरुखच्या पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिवर कोट्यवधींची कमाई करेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Rakhi Sawant: उमराह करुन मुंबईला परतल्यानंतर राखी सावंत चाहत्यांना म्हणाली, "मला फातिमा म्हणा"; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल