Marathwada Fodder Issue : यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणले आहे. पाऊस पडला नसल्याने शेतकरी राजा प्रचंड प्रमाणात संकटात सापडला आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच मराठवाड्यात सुरुवातीलाच पाऊस एक महिना उशिराने सुरू झाला आणि त्यानंतर देखील जवळपास मागील 28 दिवसापासून पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात आहे. कारण  शेतातील जनावराच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात धडपडत आहे. 


मराठवाड्यामध्ये 48 लाख 61 हजार एवढी लहान मोठी जनावरे आहेत.  यामध्ये गोवंशीय सर्व लहान मोठ्या जनावरांचा समावेश होतो. या जनावरांना दर दिवशी पंचवीस हजार पाचशे टन इतका चारा लागतो. आता मराठवाड्यात फक्त 21 लाख 77 हजार 200 इतकाच चारा उपलब्ध आहे  या सर्व चाऱ्यांचा अंदाज लक्षात घेता हा चारा फक्त पुढील 85 दिवस पुरेल इतकाच चारा आहे. अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे झालेल्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत समोर आली होती.  त्यामुळे शेतातील पिकाबरोबरच शेतात असलेले जनावरे कशी जगवायची असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर सध्याच्या घडीला उभा आहे. शेतीला  जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला पसंती दिली आहे. आता दुग्ध व्यवसाय सुद्धा बुडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गाई म्हशींना चारण्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे.  त्यामुळे  शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे गेल्यावर्षीचा सुका चारा होता तो आजपर्यंत ते पुरवत आले आहेत. परंतु आता इथून पुढे जनावरांना खायला काय द्यायचे  काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण 
आतापर्यंत शेतात लागवड केलेला चाऱ्याची वाढ होन अपेक्षित होतं आणि त्यानुसार शेतकरी जनावरांच्या चाऱ्याच नियोजन करत असतात परंतु अपेक्षेप्रमाणे पाऊसच न झाल्याने  चारा वाढला नाही आता शेतातील जनावरांना काय खाऊ घालायचे आसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती किती चारा उपलब्ध


छत्रपती संभाजी नगर  2,22,700  टन इतका चारा शिल्लक आहे तर  हा चारा  पुढील 67 दिवस पुरेल. जालना जिल्ह्यात  1,58,849 टन इतका चारा शिल्लक आहे हा चारा पुढील 56 दिवस पुरेल. परभणी जिल्ह्यात 1,79,117 टन चारा शिल्लक आहे हा चारा पुढील 61 दिवस पुरेल. बीड जिल्ह्यात 6,72,891 टन चारा आहे तो चारा पुढील 166 दिवस पुरेल. लातूर जिल्ह्यात 2,34,846 टन  चारा आहे हा चारा पुढील 90 दिवस पुरेल. तर धाराशिव मध्ये 3,62,142 टन चारा आहे पुढील 90 दिवस चारा पुरेल. नांदेड  जिल्ह्यात 2,45,598 टन चारा आहे पुढील 60 दिवस पुरेल. हिंगोली जिल्ह्यात 1,01,088 टन इतका चारा आहे तो पुढील 60 दिवस पुरेल 


 


इतर महत्वाच्या बातम्या


उद्यापासून देशात होणार 'हे' महत्त्वाचे बदल; तुमच्या महिन्याच्या बजेटवर होणार थेट परिणाम