Rakhi Sawant Video: एंटरटेनमेंट क्वीन अशी ओळख असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी नुकतीच उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली होती. उमराह केल्यानंतर आता राखी मुंबईत परतली आहे. राखीच्या चाहत्यांनी विमानतळावर तिचे खास पद्धतीनं स्वागत केले. राखीचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राखी उमराह करुन मुंबईमध्ये परतल्यानंतर तिच्या चाहत्यांनी एअरपोर्टवर तिचे स्वागत फुलांचा हार देऊन केले.राखीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये दिसत आहे की, फोटोग्राफर्सला म्हणते, 'मला राखी नाही फातिमा म्हणा.'
पाहा व्हिडीओ:
राखी ही गेल्या काही दिवसांपासून मदिना येथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होती.
रिपोर्टनुसार, आदिल खानसोबत (Adil Khan) लग्न करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर राखीने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एका महिलेने आदिलवर बलात्काराचा आरोपही केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. राखी सावंतने पतीवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिल खानने देखील राखीवर अनेक गंभीर आरोप केले.
राखी ही सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. 'मस्ती' आणि 'मैं हूं ना' या सिनेमांतदेखील राखीनं काम केलं आहे. राखीला कॉन्टोव्हर्सी क्वीन देखील म्हटलं जातं.
इतर महत्वाच्या बातम्या