मुंबई: मंत्रालय बॉम्बने (Bomb) उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन पुन्हा एकदा आला आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मंत्रालयात बॉम्ब (Bomb Threat) ठेवला आहे, असं कॉल करुन एका व्यक्तीने सांगितल्यानंतर सध्या मंत्रालयामध्ये पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
खबरदारी म्हणून मंत्रालयात शोधमोहीम
निनावी कॉल आल्याच्या काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली आहे. मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड (Dog Squad) देखील दाखल झालं आहे. पोलीस मंत्रालयातील कानाकोपरा तपासत आहे आणि सर्व जागांची नीट तपासणी करत आहेत.
नेमकी का दिली धमकी?
मंत्रालयात धमकीचा कॉल करणारा व्यक्ती हा मूळचा अहमदनगरचा आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्याने त्रस्त होऊन ही धमकी दिली.
'मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या, नाहीतर...'
गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देईल, अशी धमकी निनावी कॉल करणाऱ्या व्यक्तीने दिली. त्याने पुढे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली. निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर (Ahmednagar) येथून फोन केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. पुढे प्रकरणाचा सविस्तर तपास मुंबई पोलीस करत आहेत.
प्रशासकीय इमारतीत चाकू घेवून जाताना एक जण ताब्यात
मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर देखील आज अशीच काही घटना घडली आहे. प्रशासकीय इमारतीत चाकू घेवून जाताना एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. बॅग स्कॅनरमध्ये बॅग स्कॅन करताना धारदार चाकू सापडला आहे. पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेतल्याने व्यक्तीच्या बॅगेतील चाकू ताब्यात घेण्यात आला आहे. उमरगा येथून आलेल्या एका तरुणाच्या बॅगेत हा चाकू सापडला. बॅगेत चाकू घेऊन येण्यामागचं कारण काय? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: