एक्स्प्लोर

Janhavi Killekar On Chota Pudhari: छोटा पुढारीने VIDEO वर कमेंट करताच जान्हवी किल्लेकर प्रचंड भडकली, तिथल्या तिथे सुनावलं, म्हणाली, 'शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का? ' नेमकं काय घडलं ?

' जास्त शहाणपणा करू नकोस. लोकांसाठी आहे पण तुला अक्कल नाही का? असं म्हणत जान्हवीने थेट छोटा पुढारीला सुनावलं. 

Janhavi Killekar Angry On Chota pudhari: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची फायनलिस्ट जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) कायम तिच्या रोखठोक बोलण्याने चर्चा असते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते . सोशल मीडियावर जान्हवीच्या एका व्हिडिओमुळे सध्या तिची चर्चा सुरू आहे.  जान्हवी किल्लेकर आणि अभिनेता ओम यादव कुटुंबीयांसोबत जेजुरीला गेली होती. या व्हिडिओवर छोटा पुढारीने केलेल्या कमेंटवर जान्हवी भडकली आहे. ' जास्त शहाणपणा करू नकोस. लोकांचं ठीक आहे, पण तुला अक्कल नाही का? असं म्हणत जान्हवीने थेट छोटा पुढारीला सुनावलं. 

नेमकं झालं काय ?

जान्हवी किल्लेकरने नुकताच एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जेजुरीला गेली होती. जान्हवी आणि ओमने एकत्र भंडारा उधळला. देवाचे दर्शन घेतलं. कुटुंबीयांसोबत फोटोही काढल्याचे दिसलं. तिच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी 'जय मल्हार' म्हणत स्वागत केलं. मात्र, जान्हवीच्या या व्हिडिओवर छोटा पुढारीने केलेल्या आगाऊ कमेंटमुळे जान्हवी किल्लेकर त्याच्यावर चांगलीच भडकली. कमेंट सेक्शनमध्येच जान्हवीने छोटा पुढारीला सुनावलं. नंतर चाहत्यांनीही त्याला ट्रोल केलं. शेवटी ओम यादवला कमेंट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

काय म्हणाला छोटा पुढारी ?

जेजुरीत एकत्र दर्शन घेतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, छोटा पुढारीने जान्हवी आणि ओमच नाव एकमेकांसोबत जोडलं . " नक्कीच तुमची छान मैत्री असू शकते. पण, ज्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ येत आहेत यावरून लोकांना प्रश्न पडणारच ना.. बाकी तुमचं जे असेल ते ' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्यानंतर छोटा पुढारी म्हणाला ' ओम दादा हे बरोबर नाही बरं ..तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. मी तुमचा लहान भाऊ आहे,त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल.पण देवाला आमचा एक निरोप द्या..आम्हाला पण एक वहिनी आली पाहिजे आता ' अशी कमेंट त्याने केली आहे. 

यावर ओम यादवनं ' नक्कीच घनश्याम. तू लग्न केलंस की मी लगेच करणार लग्न, प्रॉमिस' असं म्हटलं. पण जान्हवीला छोट्या पुढारीचा हा आगाऊपणा अजिबात आवडला नाही. तिने कमेंटलाच रिप्लाय करत त्याला सुनावलं. 

जान्हवी छोटा पुढारीवर भडकली..

जान्हवी किल्लेकरला छोट्या पुढारीच्या कमेंटमधून त्याचा आगाऊपणा करताच तिने तिथल्या तिथे त्याला सुनावलं. 'जास्त शहाणपणा करू नकोस..लोकांचे ठीक आहे ..पण तुला अक्कल नाही का ? असं ती म्हणाली. जान्हवीच्या कमेंटनंतर अनेक जण छोटा पुढारीला ट्रोल करू लागले. शेवटी ओम यादवला या व्हिडिओवर कमेंट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं. तो म्हणाला ' अति उत्सुक कमेंट करणारे, अरे थांबा थांबा.. कन्फ्युज होऊ नका. आम्ही फक्त एकमेकांना सपोर्ट करणारे फक्त आणि फक्त बेस्ट फ्रेंड आहोत आणि कायम राहू. इव्हेंट निमित्त महाराष्ट्रभर आम्ही जात असतो. तात्या भागातील देवस्थानांचा दर्शन आम्ही घेत असतो. तसंच जेजुरीला देखील देवदर्शन केलं. जान्हवीचं पूर्ण कुटुंब देखील सोबत होतं. आमची मैत्री एकदम क्लिअर आहे. कलाकार म्हणून आमचा एकमेकांना कायम सपोर्ट करत असतो व तो कायम असेल. 


Janhavi Killekar On Chota Pudhari: छोटा पुढारीने VIDEO वर कमेंट करताच जान्हवी किल्लेकर प्रचंड भडकली, तिथल्या तिथे सुनावलं, म्हणाली, 'शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का? ' नेमकं काय घडलं ?

आणखी एक गोष्ट. इव्हेंटला गेल्यावर आयोजकांची इच्छा असते की दोघांनी काहीतरी डान्स परफॉर्मन्स केला पाहिजे.आम्हालाही आयोजक व प्रेक्षक नाराज करता येत नाहीत.कारण शेवटी आयोजकांनी लाखो रुपये मोजलेले असतात.नंतर रील चे व्हिडिओ व्हायरल होतात पण ते कलाकार म्हणून समजून घ्या.प्रेक्षकांची फेवरेट जोडी म्हणून सर्वांना आम्ही आवडतो, याचा आम्हाला आदरच आहे व कायम राहील.कमेंट करताना याचे भान ठेवावे ही विनंती. 'असं ओम यादव म्हणाला. या सगळ्या प्रकारानंतर छोटा पुढारीने त्याची कमेंट डिलीट केली आहे. आता जान्हवीची कमेंट डिलिट केलेली दिसतेय. पण दोघांमध्ये उडालेल्या खटक्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर रंगली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
Actress Purva Kaushik Emotional On CJP Protest: 'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
'हेल्पलेस फील होतंय, माणसाची किंमत इतकी कमीय, माहीत नव्हतं'; विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री हादरली, VIDEO
Naseeruddin Shah On Violence With Students: 'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप
'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप
Kaylee Hottle Death: सिनेसृष्टी गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 18 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा
सिनेसृष्टी गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 18 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Embed widget