एक्स्प्लोर

Janak Marathi Movie Teaser: न्यायाच्या दरबारात लेकीचा हुंकार, बापाच्या सन्मानाचा महासंग्राम; सायली संजीवच्या सिनेमाचा टीझर पाहिलात?

Janak Marathi Movie Teaser: सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सिनेप्रेमींच्या भेटीला आला असून, त्यातील भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.

Janak Marathi Movie Teaser: ज्या बापानं लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या सन्मानासाठी लेकच ढाल बनून उभी ठाकते! एका बाजूला आरोपांचं वादळ, तर दुसऱ्या बाजूला बापासाठी सर्वस्व पणाला लावणारी लेकीची जिद्द. अशा संघर्षातून उलगडणारा 'जनक' (Janak Marathi Movie) हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा प्रवास नाही, तर स्वाभिमानासाठी पेटलेल्या लढ्याची कहाणी आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सिनेप्रेमींच्या भेटीला आला असून, त्यातील भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.

अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत 'जनक'

सिनेमाचा टीझर बाप-लेकीच्या नात्याची ताकद दाखवतानाच अनेक प्रश्न उपस्थित करतो. या टीझरमध्ये सायली संजीव एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसत असून, तिच्या व्यक्तिरेखेचा नवा आणि दमदार पैलू पाहायला मिळतो. वडिलांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी म्हणून तिच्या भूमिकेतील ताकद आणि भावनिक खोली लक्ष वेधून घेते. दुसरीकडे, आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित करणारे अविनाश नारकर यांनी पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. एका बाजूला वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, तर दुसऱ्या बाजूला वडिलांसाठी लढण्याची वेळ, अशा परिस्थितीत सायलीची भूमिका कथेला नवं परिमाण देणारी ठरणार आहे. तर सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा यांच्यात रंगणारा कोर्टरूम ड्रामा चित्रपटातील न्यायालयीन संघर्षाला निर्णायक वळण देणार आहे. 

अभिषेक कंवर यांनी 'जनक'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओंकार भसमे यांचे असून, त्रिलोक सिंह राजपूत यांनी असोसिएट प्रोड्युसर, तर सुजीत मुकाटे यांनी कार्यकारी निर्माते म्हणून योगदान दिलं आहे. सिनेमाचं संगीत आदित्य कडताने यांनी दिलं आहे.

न्यायालयात नेमकं काय घडणार? सत्याचा विजय होणार की, आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार? या प्रश्नांची उत्सुकता टीझरमधून अधिकच वाढते. 

नात्यांची कसोटी, स्वाभिमानाची लढाई आणि न्यायालयातील उत्कंठावर्धक संघर्ष उलगडणारा अभिषेक कंवर दिग्दर्शित, आरटीबी फिल्म्स प्रस्तुत 'जनक' हा कोर्टरूम थ्रिलर 13 नोव्हेंबर 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

टीझर पाहिलात? 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lalit Prabhakar Namdeo Dhasal Look: कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Sachin Patekar Emotional Post: 'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
Ramayana Actor Ranbir Kapoor Mistake In Speech: 'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी, घडलं काय?
'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Embed widget