Jahnavi Killekar On Trollers: 'नवरा विकला का काय?', विचारणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरनं झोड झोड झोडलं, म्हणाली, 'तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...', VIDEO
Jahnavi Killekar On Trollers: सध्या गणेशोत्सवाची धामधूम देशभरात सुरू आहे. त्याच निमित्तानं जान्हवीनं 'सण गौरी गणपतीचा आला' या गाण्यावर एक रिल बनवून शेअर केलेलं. पण, त्यावरुन तिला प्रचंड ट्रोल केलं.

Jahnavi Killekar On Trollers: 'बिग बॉस मराठी 5'मुळे (Bigg Boss Marathi 5) घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे, जान्हवी किल्लेकर (Actress Jahnavi Killekar). 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) मधील बिनधास्त, पण काहीशा वादग्रस्त भांडणांमुळे जान्हवी किल्लेकर संपूर्ण सीझनभर चर्चेत राहिली. तेव्हापासून जान्हवी कित्येकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. ती आपले ग्लॅमरस फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. बऱ्याचदा जान्हवी ट्रोलही होते. पण, तिच्या परखड आणि स्पष्ट स्वभावासाठीही ती ओळखली जाते.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम देशभरात सुरू आहे. त्याच निमित्तानं जान्हवीनं 'सण गौरी गणपतीचा आला' या गाण्यावर एक रिल बनवून शेअर केलेलं. यामध्ये जान्हवी 'सण गौरी गणपतीचा आला' गाण्यावर ठेका धरताना दिसलेली. पण, जान्हवीच्या याच रिलवर आक्षेप घेत, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. गणपतीकडे पाठ करुन नाचल्यामुळे नेटकऱ्यांनी जान्हवीला जोरदार ट्रोल केलं. पण, आता यावर जान्हवीनं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं असून तिनं ट्रोलर्सना तिखट शब्दांत सणसणीत टोला लगावला आहे.
View this post on Instagram
'तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...'; जान्हवीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर (Jahnavi Killekar Comment On Trollers)
मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनं ट्रोलर्सना फटकारत स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये जान्हवीनं म्हटलंय की, "हाय, हॅलो नमस्कार. आजचा हा व्हिडीओ माझ्या ट्रोलर्ससाठी आहे. खरंतर मला आज प्रचंड हसायला येतंय. अजिबात वाईट वाटत नाहीये, कारण सगळ्यांना माझ्या प्रत्येक व्हिडीओमध्ये काही ना काही चुका काढायच्याच आहेत... आता गणपतीचा पहिला दिवस होता, खूप सिंपल लूक केला होता. मेकअप केला नव्हता, टिकली लावलीय, मंगळसूत्र घातलंय, सुंदर साडी नेसलीय. देवासमोर हात जोडलेत. त्यावर एकाची 'नवरा विकला का काय?' अशी कमेंट होती. दुसऱ्या दिवशी मी आणि माझ्या जाऊबाईंनी रील्स टाकल्या. त्यावर 'देवाकडे पाठ करून तुम्ही नाचताय' अशा कमेंट्स होत्या..."
जान्हवी किल्लेकर पुढे बोलताना म्हणाली की, "काहीतरी पटेल असं तरी बोला. ही अशी कमेंट्स करणारी तीच माणसं आहेत, जी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रीत देवासमोर बायका नाचवतात... अशी माणसं मला ज्ञान शिकवतात की, देवाकडे पाठ करून नाचतेय. तुम्हाला माझ्या काही ना काही चुका काढायच्याच आहेत, म्हणून तुम्ही काहीही बोलाल, ट्रोलर्सना वेळ मिळतो कुठून?"
मला काहीही फरक पडत नाही... : जान्हवी किल्लेकर
पुढे बोलताना जान्हवीनं म्हटलंय की, "मला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. मी माझं आयुष्य आनंदानं जगतेय. देव माझ्या पाठीशी आहे. मी प्रचंड यशस्वी आहे. तुमच्या बोलण्यानं मला काही फरक पडत नाही. हीच माणसं जेव्हा सार्वजनिक गणपतीचं विसर्जन असतं तेव्हा देवाच्या समोर नाचतात, त्यावेळी देवाला पाठ करूनच नाचता ना? पण, जान्हवी नाचली म्हणजे काहीतरी बोलायला पाहिजे, असंच सगळं करत राहा..."
"तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे बघत बसण्यासाठी, लक्ष देण्यासाठी जान्हवीकडे अजिबात वेळ नाही... कारण तिचे बरेच प्रेम करणारे चाहते आहेत. मला माझा सगळा वेळ त्यांना द्यायला आवडेल. बाप्पाकडे नक्कीच प्रार्थना करेन की, तुमच्यासारख्या मानसिकता असलेल्या लोकांना सद्बुद्धी देवो...", असं जान्हवी किल्लेकर म्हणाली.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना जान्हवी किल्लेकरनं कॅप्शन शेअर केलंय. जान्हवी किल्लेकरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आता परत वाईट comments येणार...." आगाऊ... म्हणून comment section off kartey..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha






















