Isha Koppikar Divorce : बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चत आहे. ईशाच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तिने पती टिम्मी नारंग यांच्या घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटस्फोटाबाबत तिचा टिम्मी नारंग यानेही मोठा खुलासा केला आहे.
2009 मध्ये बांधली होती लगीनगाठ
ईशा कोप्पीकरने 2009 मध्ये टिम्मी नारंग यांच्याशी विवाह केला होता. दोघांना एक मुलगीही झाली होती. रियाना नारंग असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी ईशा कोप्पीकर आणि तिचा पती टिम्मी नारंग आता वेगळे होणार आहेत.
यापूर्वीच झाली होती पतीपासून वेगळी
ईशा कोप्पीकर वर्षभरापासूनच पती टिम्मी नारंग यांच्यापासून दूर झाली होती. मात्र, तरीही त्यांच्या घटस्फोटाबाबतच्या बातम्यांनी सातत्याने आल्या. त्यामुळे खरच घटस्फोट झाला की नाही? याबाबत स्पष्टता नव्हती. आता मात्र, पती टिम्मी नारंग याने देखील घटस्फोटांच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. सध्या ईशा त्याच्या पतीपासून दूर गेली आहे. शिवाय गेल्या वर्षाभरापासून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. त्यामुळे ते वेगले राहत होते.
मागील वर्षीच घेतला होता घटस्फोट
ईशा कोप्पीकरचा घटस्फोटीत पती म्हणाला, "जवळपास दीड वर्षे घटस्फोट घ्यायचा की नाही? यावर विचार केला. दरम्यान सर्व विचार करुन आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच घेतला होता. दोघांच्याही सहमतीने आणि विचाराने आम्ही हा निर्णय घेतला होता. आता आम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मला अजूनही समजले नाही की, लोक आमच्याबाबत एवढे कंफ्युज का आहेत?"
टिम्मी नारंगने भाष्य करत अफवांना लावला पूर्णविराम
गेल्या काही महिन्यांमध्ये ईशा कोप्पीकरच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. शिवाय त्यानंतर ईशा केवळ कायदेविषयक मार्गाचा अवलंब करत आहे. घटस्फोट अद्याप घेतलेला नाही, असे बोलले जात होते. आता मात्र, तिच्या पतीनेच याबाबत भाष्य केल्याने घटस्फोटाबाबतच्या अफवांना पूर्णविराम लागला आहे. टिम्मी नारंगबरोबर विवाह केल्यानंतर ईशा कोप्पीकर सिनेक्षेत्रापासून दूरच राहिली. कृष्णा कॉटेज, डॉन, सलाम-ए-इश्क, 36 चायना टाऊन, कयामत, दिला का रिश्ता, आणि एलओसी कारगिल यांसारख्या हिट सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या