एक्स्प्लोर

सलग दोन लीड मालिका मधूनच सोडल्या; 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधून काढता पाय घेताच मालिकाच बंद झाली; अभिनेत्री ईशा केसकरनं सांगितलं कारण

मालिका सोडण्याच्या निर्णयांमुळे अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री ईशा केसकरने मालिका सोडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Isha Keskar on Exit Serials: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी ' मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय होती. टीआरपीवरही टॉपला असलेल्या या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ईशा केसकरने मालिका सोडली आणि अवघ्या महिन्याभरात वाहिनीलाच ही मालिकाच गुंडाळावी लागली.यापूर्वीही तिने अशाच एका मालिकेतून मधूनच निरोप घेतला होता.मालिका सोडण्याच्या निर्णयांमुळे अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री ईशा केसकरने मालिका सोडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत मालिकाविश्वात काम आणि अचानक एक्झिट घेण्यामागची कारणही तिने सांगितली आहेत.

मालिका सोडण्याविषयी काय म्हणाली ईशा केसकर?

मालिका सोडण्याविषयी ईशा म्हणाली ' कधीतरी शारीरिक स्वास्थ्य या गोष्टीला आपण गृहीत नाही धरू शकत सतत. जरी मी तरुण असले, खाण्यापिण्याकडे माझं लक्ष असलं, झोपे कडे मी प्रायोरिटीने बघत असले तरीसुद्धा रोज 16 तास किंवा 14 तास शूट करणे आणि त्याहीपेक्षा जास्त तिथलं वातावरण पण मॅटर करतं, असं मला वाटतं. थोडसं मला खूप वाटायला लागलं होतं अलीकडे की, मी यासाठी बनले नाहीये. मला अनेक मोठ्या कलाकारांनी सांगितलं होतं की, मालिकाविश्व खूप छान चकचकीत वेलकमिंग आणि पैसे देणारं असलं तरी, आपल्याकडून काहीतरी घेतं सुद्धा.भूमिका करत असताना तसा काही अनुभव नाही आला. वाईट काही नाही झालं. पण मला असं झालं की, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवायचा आहे. माझ्या तब्येतीसाठी द्यायचा होता. पण मालिकाही मला तेवढीच महत्त्वाची होती. चॅनल - प्रोडक्शन -मी एक कलाकार म्हणून आम्ही असे एका प्रॉब्लेममध्ये आलो की जिथे त्यांना काही मध्य काढता येत नव्हता.आणि मीही काही मदत करू शकत नव्हते. पण मला असं वाटत होतं की काहीतरी मध्ये निघेल.पण दुर्दैवाने तसं नाही घडलं.  

ती म्हणाली 'शेवटी मला प्रेक्षकांना एकच गोष्ट सांगायची की जेवढे काही काम मी करू शकले ते मी मनापासून केलं. ते माझ्याकडून जेवढे 100 -200% देता येतील तेवढे मी दिले.मी त्यातून आनंदही घेतला.आणि त्याबद्दल मला जे प्रेम मिळालं त्यासाठी मी कायम ऋणी आहे.  माझा कायम असा प्रयत्न असतो की माझी कुठलीही भूमिका आधीच्या भूमिकेसारखी नसावी.या सगळ्यामुळे मी एक्झॉस्ट झाले.ते प्रेशर मला जरा जास्त वाटलं.कदाचित म्हणूनच मी लीडमध्ये मालिका करायला नको असं मला बऱ्याच जणांनी कमेंट केली.पण मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न केला. ' असं ईशा केसकरने सांगितलं.

"मालिका सोडताना पुढचा विचार करण्याचा वेळच मला माझ्या शरीराने दिला नाही.आपल्याला हात पाय दुखत असतील मानेखाली काही होत असेल तर टीव्ही कलाकाराला काही फरक पडत नाही.पण माझ्या डोळ्यावर एक फोड आला होता, जो बरा व्हायला वेळ घेणार होता. त्यासाठी मला दहा तास झोपणं गरजेचं होतं. माझ्या पाण्याचा इंटेक पूर्ण होणं अपेक्षित होतं. यापूर्वी जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी समांतर रेषेत दुसरी लीड अभिनेत्री होती.त्यामुळे त्या मालिकेत माझ्यावर प्रेशर नव्हतं.पण इथे ते माझ्यावर आलं. एक वर्ष मी ते काम खूप आनंदाने केलं.पण सहकलाकार असल्याने दुसऱ्या वर्षी फारच धावपळ झाली.अशा वेळेस आपण जरा विचार केला पाहिजे.त्यांचं नुकसान होण्यापेक्षा आणि माझेही मोठे नुकसान होण्यापेक्षा मी आत्ताच त्यातून वेगळं होणं मला जास्त योग्य वाटत होतं.म्हणून मी मालिका सोडली. पण आता असं चित्र झालं की 'ईशा मालिका सोडते ' इतर कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा आता टोमणे मारतात." ईशा केसकर म्हणाली. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Embed widget