Indian Idol 14 : इंडियन आयडोल (Indian Idol) सध्याच्या घडीला टीव्हीवरिल लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या इंडियन आयडॉलचा (Indian Idol) 14 वा सिझन सुरु आहे. या शो मध्ये प्रत्येक आठवड्यात एकतरी बॉलिवूड सेलिब्रिटी येत असतो. या वेळी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) इंडियन आयडॉलच्या मंचावर आला होता. संजय दत्तने हजेरी लावलेला एपिसोडचा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. संजय दत्तने या शो दरम्यान, दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची आई नर्गिस दत्त हिच्या आठवणींना उजाळा दिलाय. 


प्रोमोमध्ये संजय दत्तचे (Sanjay Dutt) जोरदार स्वागत झालेले पाहायला मिळत आहे. त्यानंतर शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेली अनन्या पाल गायनाला सुरुवात करते. संजय दत्तला तिचा आवाज फार आवडतो. त्याने शो मध्ये अनन्याच्या आवाजाचे तोंड भरुन कौतुकही केले आहे. संजय दत्त म्हणाला, "मला वाटतय तुमचं गाण ऐकतच राहावे. तुमचा आवाज फार प्रेमळ आहे."


आई नर्गिसच्या आठवणींना उजाळा 


इंडियन आयडॉल 14 च्या शोमध्ये संजय दत्तने आई नर्गिस दत्तच्या (Nargis Dutt) आठवणींना उजाळा दिला. गायक श्रेया घोषाल एपिसोडदरम्यान संजय दत्तला विचारते की, तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाते फार चांगले होते. त्याविषयी तुम्ही काही बोलू इच्छिता का? यावर आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना संजय दत्त म्हणाला, मला केवळ एवढेच सांगायच आहे की, आपण आई-वडिलांना नेहमी हलक्यात घेतो. आपल्याला वाटत असते की, ते आपल्यासाठी कायम उपलब्द असतील."


आईचे ऐकले नाही आता होतोय पश्चाताप 


आईच्या आठवणींना उजाळा देताना संजय दत्त म्हणाला, माझ्या आईला मला जे काही सांगितले होते ते सर्व आज आठवते. ती मला म्हणायची की, माझ्यासोबत वेळ घालव. माझ्यासोबत थोड्यावेळ बस, असं म्हणत होती. कारण तिला माहिती होते की, तिच्याकडे जास्त वेळ नाही. मला आजही पश्चाताप होतोय की, मी तिच्यासोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही. 


संजय दत्तचे सर्वोत्कृष्ट सिनेमे कोणते? (Sanjay Dutt best Movies)


सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. महेश भट्ट दिग्दर्शित सडक या सिनेमात संजय मुख्य भूमिकेत होता. त्याचे 'साजन', 'कुरुक्षेत्र' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Salaar Box Office Collection Day 14: प्रभासच्या ‘सालार’ च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण; जाणून घ्या 14 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन