Joginder Sharma : भारताला टी 20 विश्वचषक जिंकवून देणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माच्या (Joginder Sharma) अडचणीत वाढ झाली आहे. जोगिंदर शर्मावर युवकाला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हरियाणामधील (Hariyana) हिसारच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगिंदरने 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमधील शेवटचे षटक उत्कृष्टपणे टाकले होते. त्याने टाकलेल्या शेवटच्या षटकाच्या जोरावर भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता.


जोगिंदर शर्मासह आणखी 6 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगिंदरसह (Joginder Sharma) इतर 6 जणांवर डाबडा या गावातील एका युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पवन असे युवकाचे नाव आहे. दरम्यान, याबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचे जोगिंदरने म्हटले आहे. जोगिंदर हिसारमध्ये डिएसीपी म्हणूनही कार्यकरत होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविराधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्यांच्यावर आणखी काही आरोपही आहेत. हिसारच्या आझाद नगर पोलिस स्टेशनचे (Police Station) प्रभारी संदीप कुमार यांनी या प्रकरणी एफआर नोंदवली आहे. दरम्यान, लवकरच पुढील तपास करण्यात येईल. सबळ पुरावे हाती आले तर आम्ही आरोपींना अटक करु, असे आश्वासन पोलिसांनी पीडित पवनच्या कुटुंबियांना दिले आहे. 


पवनच्या कुटुंबियांकडून अटकेची मागणी 


जीवन संपवलेल्या पवन कुमारच्या कुटुंबियांनी जोगिंदर शर्मासह 6 आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही, अशा इशाराही कुटुंबियांनी गुरुवारी (दि.5) दिला होता. पवनचे कुटुंबीय आणि ग्रामीण भागातील काही नागरिक सीएमओ कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी देखील बसले आहेत. अटकेशिवाय, कुटुंबियांनी सरकारी नोकरी आणि भरपाई म्हणून 50 लाख रुपयांची मागणी केलीय.  


भारताला विश्वचषक जिंकवून देणारा स्टार गोलंदाज 


भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) असा 2007 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात शेवटच्या षटकात पाकिस्तानच्या मिसबाह उल हकला बाद करत जोगिंदरने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. यानंतर तो हरियाणामध्ये डिएसपी बनला होता. जोगिंदर हा मूळचा हरियाणातील रोहतक या गावचा आहे. त्याने भारतासाठी 4 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले आहेत. जोगिंदरने 2004 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर 2007 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 विकेट्स आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


India vs South Africa Test Match: फक्त 642 चेंडू आणि 92 वर्षांपूर्वीचा विक्रमही खल्लास; कसोटी क्रिकेटमधील सर्वात छोटा सामना कोणता?