एक्स्प्लोर

शाहरुख-सलमान -आमिरने साठी ओलांडलीय,तरुण पिढीला त्यांना बघण्यात इंटरेस्ट नाही, इम्रान खान थेटच म्हणाला..

त्यांना 30 वर्षांचे स्टारडम मिळाले आहे, ज्याची कल्पनाही करणे किंवा बरोबरी करणे कठीण आहे. पण एखाद्या कलाकाराच्या प्रवासात हे स्वाभाविक असते की वय वाढल्यावर त्याच्या भूमिका बदलतात.” असही तो म्हणाला.

Imran Khan: गेल्या 30 वर्षांपासून शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिघेही बॉलिवूडवर राज्य करत आहेत. त्यांच्या स्टारडमला टक्कर देणारे कलाकार आजपर्यंत फार कमीच आले आहेत. बॉक्स ऑफिसवर हे तीनही खान यशाची हमी समजले जातात. मात्र, मागील काही वर्षांत प्रेक्षकांची मानसिकता बदलली आहे आणि ते आता कंटेंटबाबत अधिक निवडक झाले आहेत. अशा परिस्थितीत सिनियर स्टार्सनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं अभिनेता इम्रान खान म्हणालाय. (Imran Khan)

एका वयानंतर लीड रोल करता येत नाही

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान म्हणाला, “एका विशिष्ट वयानंतर तुम्ही लीड रोल करू शकत नाही. लीडिंग मॅन म्हणून काम करणारे कलाकारही वयस्कर होत जातात. काही वर्षे अशी असतात जेव्हा तुम्ही लीडिंग मॅन म्हणून काम करू शकता, पण त्यानंतर एक अशी वेळ येते जेव्हा ते रोल तुमच्यासाठी योग्य राहत नाहीत. तिन्ही खान आता 60  वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांना 30 वर्षांचे स्टारडम मिळाले आहे, ज्याची कल्पनाही करणे किंवा बरोबरी करणे कठीण आहे. पण एखाद्या कलाकाराच्या प्रवासात हे स्वाभाविक असते की वय वाढल्यावर त्याच्या भूमिका बदलतात.”

स्टारडमही बदलत जाते

इमरान पुढे म्हणाला,“स्टारडम देखील बदलत जाते. एक प्रेक्षकवर्ग असा असतो जो तुमच्यासोबत मोठा झालेला असतो, पण त्याचवेळी एक नवीन तरुण पिढीही येते, जी स्वतःच्या वयाच्या आणि अनुभवाच्या जवळच्या लोकांशी जोडली जाते. जेव्हा आपण चित्रपट किंवा शो पाहतो, तेव्हा त्या कथांमध्ये आणि पात्रांमध्ये स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतो. स्वाभाविकच, आपण आपल्या वयाच्या आणि जीवनानुभवाच्या जवळच्या व्यक्तीशी अधिक जोडले जातो. तरुण पिढी कदाचित 70 वर्षांच्या माणसाची कथा पाहू इच्छित नाही.”

शाहरुख, आमिर आणि सलमानची बॉक्स ऑफिस स्थिती

शाहरुख खान: 2018 मध्ये झिरो फ्लॉप ठरल्यानंतर 2023 मध्ये पठाण आणि जवानद्वारे दमदार कमबॅक केला. हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. मात्र, त्याच वर्षी आलेल्या डंकीला अपेक्षित यश मिळाले नाही. आता त्याच्या आगामी किंग चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

आमिर खान: लाल सिंह चड्ढा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर आलेल्या सितारे जमीन पर या चित्रपटाने सरासरी कमाई केली.

सलमान खान: 2018 पासून सलमान खान कठीण काळातून जात आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांना व्यावसायिक अपयश आले, ज्यात सिकंदरचाही समावेश आहे. आता त्यांचा बॅटल ऑफ गलवान हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget