Hruta Durgule and Ajinkya Raut New Movie : अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही अनेक सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हृता ही नुकतीच झी मराठी वाहिनीवरील 'मन उडु उडु झालं' या मालिकेत झळकली होती. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि तिची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. छोट्या पडद्यावर या रॉमँटीक जोडीने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हीच जोडी मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जोडीचा कन्नी हा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 


या चित्रपटात हृता आणि अजिंक्यसह तगडी स्टारकास्ट आहे. शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांची देखील या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे. नुकतच या सिनेमातलं 'मन बावरे' हे रोमँटिक गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. त्यांचा कन्नी हा सिनेमा 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 






रोमँटीक गाण्याची प्रेक्षकांना पर्वणी 


या रोमँटीक गाण्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना तसेच हृता आणि अजिंक्यच्या चाहत्यांना या प्रेमळ जोडीचे काही गोड क्षण पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या या गाण्याला सध्या सोशल मीडियावरही बरीच पसंती मिळत आहे. अमर ढेंबरे याने या हे गीत लिहिलं असून विशाल शेळकेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गायिका किर्ती किल्लेदार आणि अभय जोधपूरकर यांनी हे गाणं गायलं आहे. 






हृताचे चित्रपट आणि मालिका


 टाईपमपास-3, अनन्या या चित्रपटांमधील हृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हृतानं मन उडू उडू झालं, फुलपाखरु आणि दुर्वा या मालिकांमध्ये काम केलं आहे. आता हृताच्या कन्नी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


ही बातमी वाचा : 


Ravindra Mahajani : रविंद्र महाजनी यांना मरणोत्तर व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान, गष्मीरने स्विकारला वडिलांचा सन्मान