2G Services : भारतात (India) 2030 पर्यंत  6G नेटवर्क सेटअप करण्याचे सरकारचे (Govt) उद्दिष्ट आहे. तर दुसरीकडे, 2G/3G सेवा बंद करण्याबाबत दूरसंचार विभाग नेमका काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरु आहे. सध्या देशात बहुतांश ठिकाणी 4G आणि 5G सेवा सुरू आहेत. अशा परिस्थितीत 2G आणि 3G नेटवर्क बंद करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

काही काळापूर्वी अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने केंद्र सरकारला या सेवा बंद करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सर्व दूरसंचार ग्राहकांना 4G-5G नेटवर्ककडे वळवण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत दूरसंचार विभागाबाबत (DoT) सरकारच्या भूमिकेबाबत एक अपडेट आले आहे, ज्यामुळं हे स्पष्ट होते की सरकार या विषयावर स्वत:हून निर्णय घेऊ इच्छित नाही.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, दूरसंचार विभाग देशातील 2जी नेटवर्क बंद करण्याच्या बाबतीत हस्तक्षेप करु इच्छित नाही. दूरसंचार विभागानं रिलायन्स जिओची ही मागणी फेटाळली आहे. हा एक व्यावसायिक निर्णय आहे जो दूरसंचार ऑपरेटर्सनी घ्यावा. सरकारला अशा बाबींमध्ये ढवळाढवळ करायची नाही. दूरसंचार कंपन्याना त्यांच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे ठरवण्याचे स्वतंत्र आहे. 

देशात लवकरच सुरु होणार 6G नेटवर्क 

भारतात 6G नेटवर्कची तयारी गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत 2G-3G तंत्रज्ञान सुरू ठेवणे कितपत तर्कसंगत आहे, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण हे खरे आहे की, देशात 2G आणि 3G नेटवर्क वापरणारी लोकसंख्या मोठी आहे. 1992 साली देशात 2G नेटवर्क आले आणि ते येऊन 32 वर्षे झाली. भारतात अंदाजे 25 ते 30 कोटी 2G ग्राहक आहेत.

कोणते नेटवर्क कधी आले

2G - 19923G - 20014G - 20095G - 2019

सध्या देशात 2G चा वापर मोठ्या प्रमाणात 

पुढील किमान 2 ते 3 वर्षे  2G भारतात मुख्य प्रवाहात राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशातील मोठ्या संख्येने लोक अजूनही 2G वापरतात. विशेषत: जे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत त्यांच्यासाठी फक्त 2G-3G नेटवर्क प्रभावी आहे. दूरसंचार उद्योगाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात सुमारे 5 कोटी 2G फोन विकले जातात. दरम्यान, रिलायन्स जिओ भारतातील 2G नेटवर्क बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व ग्राहकांना 4G/5G वर वळवण्याचा रिलायन्सचा प्रयत्न आहे. जिओ स्वतःहून 2G सेवा बंद करण्याची मागणी करण्यास स्वतंत्र आहे, परंतु असा निर्णय बाजारातील सर्व घटकांवर अवलंबून असल्याची माहिती एका तज्ज्ञाने दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

2G मुक्त अन् 5G युक्त भारत, जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन.. जाणून घ्या रिलायन्सच्या वार्षिक बैठकीतील 10 मोठ्या गोष्टी