War 2 vs Lahore 1947: बॉलिवुडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. या क्षेत्रात प्रत्येकवेळी नवनव्या चित्रपटांविषयी चर्चा केली जाते. हे वर्षदेखील बॉलिवुडसाठी अगदीच खास ठरणार आहे. कारण या वर्षी सलमान खानपासून ते ऋतिक रोशनसारख्या दिग्ज अभिनेत्याचे चित्रपट येणार आहेत. असे असतानाच आता या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रा सनी देओल आणि ऋतिक रोशन यांच्यात कुस्ती होण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झालेच तर या दोन्ही बड्या अभिनेत्यांत स्पर्धा रंगणार आहे.
दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार?
सनी देओलने गदर-2 या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. सनी देओलचा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. त्यानंतर आता सनीच्या दुसऱ्या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. असे असताना याच वर्षी सनी देओलचा लाहोर-1947 हा बहुप्रतिक्षीत चित्रपट येणार आहे. यासह ऋतिक रोशनचाही वॉर-2 हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही बड्या अभिनेत्यांचे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाहौर-1947 हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच दिवशी वॉर-2 हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ऋतिक रोशनचा वॉर-2 चित्रपट येणार
वॉर-2 हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचाच एक भाग आहे. या चित्रपटाची कहाणी चांगलीच रंजक असणार आहे. ऋतिक रोशन नुकतेच टायगर-3 या चित्रपटात दिसला होता. त्यामुळे या स्पाय युनिव्हर्समध्ये पाठाण हे पात्र साकारणारा शाहरुख खानही झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वॉर-2 या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरदेखी दिसणार आहे.
सनी देओलसोबत प्रीति झिंटा दिसणार
दुसरीकडे लाहोर-1947 या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात सनी देओल हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून प्रीति झिंटा दिसणार आहे. या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा असं सगळंच दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाला अभिनेता आमीर खान प्रोड्यूस करत आहे. तर राजकु्मार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रिकरणही पूर्ण झाले आहे.
दरम्यान हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले, तर कोण बाजी मारणार? कोण वरचढ ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याआधी हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेचं मराठमोळं फोटोशूट; पाहा खास फोटो!