Pushpa 2 The Rule Making Video: दाक्षिणात्त्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा-2 या चित्रपटाने भारतासह जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शित होऊन महिला उलटेलाला असला तरी हा चित्रपट सिनेमागृहांत अजूनही चालूच आहे. दरम्यान, एकीकडे या चित्रपटाची सगळीकडे चर्चा चालू असताना हा चित्रपट नेमका कसा तयार करण्यात आला? हा सांगणारा एक व्हिडीओ निर्मात्यांनी पोस्ट केला आहे. फिल्म मेकिंगचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चित्रपटातील कलाकार तसेच क्रू मेंबर्सची मेहनत दिसत आहे. 


टी-सिरीज कंपनीने शेअर केला व्हिडीओ 


पुष्पा 2 : द रूल हा चित्रपट गेल्या 30 ते 35 दिवसांपासून सिनेमागृहांत चालू आहे. अजूनही लोक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सोबतच या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला हे. टी-सिरीज या कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मेकिंगचा हा व्हिडीओ शेअर करताना “पेश है भारतीय सिनेमा का इंडस्ट्री हिट - पुष्पा 2: द रूल (मेकिंग)!!" असं समर्पक कॅप्शन देण्यात आलंय. 


 व्हिडीओत दिसतेय सर्वांचीच मेहनत 


यूट्यूबवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सव्वा दोन मिनिटांचा आहे. या व्हिडीओत पुष्पा-2 चित्रपटाचे शूटिंग कसे झाले? हे दाखवण्यात आले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना तसेच इतर कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. या व्हिडीओतून चित्रपटाच्या क्रू मेंबर्सची मेहनत तर दिसतच आहे. सोबतच या चित्रपटात दाखवण्यात आलेले भव्य सेटही या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. यासह चित्रपटाचे केंद्रस्थान असलेले कोट्यवधी रुपयांचे डमी रक्तचंदनही येथे ठेवलेले दिसत आहे. सोबतच दिग्दर्शक सुकुमार हा अल्लू अर्जुन, रश्मिक मंदाना यांना योग्य ते मार्गदर्शन करताना दिसतोय. अभिनय कसा असावा, कोणती अॅक्शन करायला हवी असं सगळं काही सुकुमार सांगताना दिसतोय.


पुष्पा-2 ची छप्परफाड कमाई


पुष्पा-2 या चित्रपटाने कमाईचे अनेक बडे रेकॉर्ड्स मोडले आहेत. या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिलंय. फहाद फासिल, अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अभिनयाचेही अनेकांनी फार कौतुक केले आहे. म्हणूनच या चित्रपटाने जगभरात एकूण 1831 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट सिनेमागृहात चालू असून तो भरभरून पैसे कमवतोय. पुष्पा-2 हा चित्रपट सध्या ब्लॉकबस्टर ठरला आहे. 


पाहा मेकिंगचा व्हिडीओ :



दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स या प्रोडक्शन कंपनीने केली आहे. सुकुमार यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर टी-सिरीज या कंपनीने चित्रपटाच्या संगिताची जबाबदारी उचललेली आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या 500 रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.  


हेही वाचा :


प्रसिद्ध अभिनेत्रीला बेदम मारहाण, बाथरुमममध्ये बॉसकडून शारीरिक शोषण; चालता-बोलताही येईना; VIDEO पाहून चाहते चिंतेत


युझीसोबतच्या घटस्फोटाचं कारण हेच? धनश्रीला घट्ट मिठी मारणारा प्रतिक उतेकर कोण?