मुंबई : दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्र हनी रोजने बॉबी चेम्मन्नूर या प्रसिद्ध उद्योजकावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप लावले आहेत. बॉबी चेम्मन्नूर यांनी लैंगिकतेवर अयोग्य पद्धतीने कमेंट्स केल्याचं हनी रोजने आपल्या तक्रारीत म्हटलंय. 7 जानेवारी रोजी हनी रोजने एर्नाकुलम येथील पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे दाखल तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने बॉबी चेम्मन्नूर यांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं जातंय. 


तुमच्या साथीदारांचीही मानसिक स्थितीदेखील तुमच्यासखीच


मिळालेल्या माहितीनुसार उद्योगपती बॉबी चेम्मन्नूर यांनी हनी रोजविषयी वारंवार आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा दावा केला जातोय.विशेष म्हणजे ही तक्रार दाखल केल्यानंतर हमी रोजने सोशल मीडियावर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये बॉबी चेम्मन्नूर तसेच त्यांच्या साथीदारांविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तुमच्या साथीदारांविरोतही लवकरच तक्रार केली जाईल. तुमच्या साथीदारांचीही मानसिक स्थितीदेखील तुमच्यासखीच आहे. तुम्हाला तुमच्या पैशांच्या ताकदीवर विश्वास आहे. तर मला भारताची न्यायप्रणाली तसेच न्यायव्यवस्थेच्या ताकदीवर विश्वास आहे, असंही हनी रोजने आपल्या या शोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलंय. 


बॉबी चेम्मन्नूर कार्यक्रमांत पाठलाग करायचा? 


हनी रोजने तक्रार केल्यानंतर बॉबी चेम्मन्नूर यांनी केलेल्या कथित कृत्यांविषयी माहिती दिली आहे. हनी रोजने 5 जानेवारी रोजी एक अनुभव सांगितला आहे. बॉबी चेम्मन्नूर हा सलग द्विअर्थी कमेंट्स करत होता. तसेच कार्यक्रमांत माझा पाठलाग करत होता, असा दावा हनी रोजने केलाय. ज्या कार्यक्रमांत हनी रोजला आमंत्रित केलेलं आहे, त्या कार्यक्रमांत बॉबी चेम्मन्नूर जायचे. अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी हा उद्योजक अपमानास्पद टिप्पण्या करायचा, असा दावा हनी रोजने केला आहे.






30 जणांविरोधात तक्रार दाखल


दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी हनी रोजविषयी अपमानास्पद टिप्पण्या केल्या होत्या.  त्यांच्याविरोधातही हनी रोजने पोलिसांत तक्रार दिली होती.  त्यानंतर एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी अभिनेत्रीच्या सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पण्या करणाऱ्या 30 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याच प्रकरणात कुंबलम येथील शाजी नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी 6 जानेवारी रोजी ताब्यात घेतलं आहे. हनी रोजने पुरावा म्हणून अपमानास्पद कमेंट्स केलेले स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत.  






बॉबी चेम्मन्नूर कोण आहेत? 


बॉबी चेम्मन्नूर हे ज्वेलरी ब्रँडचे मालक आहेत. तसेच लाईफ व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक आहे. बॉबी चेम्मन्नूर यांनी हनी रोजने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.  हनी रोज माझ्या दोन उद्घाटन कार्यक्रमांत सामील झाली होती. आम्ही त्या कार्यक्रमात डान्स केला. तसेच थट्टा-मस्करी करत गप्पा केल्या. त्यावेळी त्यांनी आमच्या या बोलण्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. कित्येक महिन्यांनी त्यांनी आता तक्रार दाखल केली आहे, असं मत बॉबी चेम्मन्नूर यांनी व्यक्त केलंय. 


हेही वाचा :


'दंगल'ची दबंगगर्ल करतेय 'या' जन्टलमनला डेट? नाव वाचून आश्चर्य वाटेल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!


Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेचं मराठमोळं फोटोशूट; पाहा खास फोटो!


करोडो रुपयांचा सेट, कोट्यवधींचं रक्तचंदन, पुष्पा-2 सिनेमा कसा तयार झाला? मेकिंगचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!