एक्स्प्लोर

Hrithik Roshan Sussanne Khan Divorce:14 वर्षांच्या संसारानंतर सेलिब्रिटी कपलनं का घेतलेला घटस्फोट?; ऋतिक रोशनच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर, सुझानच्या भावानं स्पष्टच सांगितलं...

आता सुझानचा भाऊ जायेद खान याने दोघांच्या घटस्फोटावर खुलासा केलाय. जायेद खान यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत दोघांच्या घटस्फोटाचे कारण सांगितलं. प्रतिक्रियेची सध्या एकच चर्चा आहे.

Hrithik Roshan Sussanne Khan Divorce: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) काही दिवसांपूर्वी पुतण्याच्या लग्नात केलेल्या डान्समुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याच्या भूमिकांची, डान्सची जेवढी चर्चा होते तेवढीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा बोललं जातं. विशेषतः त्याच्या आणि सुझानच्या नात्याविषयी  कायम चर्चा रंगलेली असते. विशेषतः दोघांच्या घटस्फोट याविषयी अनेकदा बोलले जाते. 14 वर्षांच्या संसारानंतर ऋतिक आणि सुझान विभक्त झाले होते. आताही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र येताना दिसतात. ऋतिकने घटस्फोट दिला तेव्हा त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन सृष्टी सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता सुझानचा भाऊ जायेद खान याने दोघांच्या घटस्फोटावर खुलासा केलाय. जायेद खान यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत दोघांच्या घटस्फोटाचे कारण सांगितलं.प्रतिक्रियेची सध्या एकच चर्चा आहे. (Hrithik Sussanne divorce)

ऋतिक सुझानच्या घटस्फोटाचे कारण काय?

सुझानचा भाऊ जायेद म्हणाला " एकत्र राहणं त्यांच्या नशिबात लिहिलं नसावं. तर एखादी गोष्ट टिकणार नसते,त्याला ओढून ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार वाईट असतं. या दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. हे सगळं कशासाठी ? अखेर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो,त्यांच्या आयुष्याचा तुम्ही भाग असतात,तुम्हाला त्यांना लहानाचं मोठं होताना पाहायचं असतं.ऋतिक आणि सुझानच्या नात्यात असंच झालं. आणि दोघांचा उद्देश मुलांवर लक्ष केंद्रित करण हा बनला.'

तो पुढे म्हणाला ' जे झालं ते झालं. आता सगळं संपलंय. आता तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. स्वतःचा आनंद शोधा,असा विचार आमच्या कुटुंबाने केला आहे.आम्ही समाजाचा दबावाखाली जगणार कुटुंब नाही. आम्ही काही गोष्टींबाबत खूप जागरूक आणि सुशिक्षित आहोत. अनेकांना असं वागणं विचित्र वाटतं, मला माहित आहे . बरेच जण याबद्दल नाराजी व्यक्त करतात.पण ठीक आहे. आम्हाला त्याची काहीही अडचण नाही. "

ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंडविषयी म्हणाला ...

जायेद ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंड विषयी म्हणाला, ' दोघांनाही खूप चांगले जोडीदार मिळाले आहेत. सबा (ऋतिकची गर्लफ्रेंड ) खूप चांगली आहे. तर सुजानचा बॉयफ्रेंड अर्सलान माझा धाकट्या भावाप्रमाणे आहे. ज्या परिस्थितीतून या दोघांना जावे लागले ते मी शब्दात मांडू शकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी ही परिस्थिती हाताळली, आपापल्या आयुष्यात प्रगती केली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडले त्याबद्दल त्यांचा मला आदर वाटतो. कारण ही गोष्ट सोपी नाही. महत्त्वाचं काय आहे ? तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. जर ही व्यक्ती खंबीर नसेल तर या जगात वावरणं खूप कठीण आहे. असं जायेद म्हणाला. प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे.ऋतिक आणि सुजानला एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि काळजीही प्रेमापेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे . असंही त्यानं म्हटलं .

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget