एक्स्प्लोर

Kantara: 80 फूटी सेटही पुरेना.. कांतारामध्ये दाखवलेलं कदंब साम्राज्य निर्मात्यांनी कसं उभारलं माहितीये?

कांतारा 1 हा एक अद्भुत अनुभव असल्याचे या सिनेमाचे निर्माते सांगतात. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे.

Kantara: एखादी कथा सिनेमात जिवंत करायचे असेल तर सिनेमाच्या निर्मात्यांना त्या कथेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एखाद्या छोट्याशा जागेत उभ्या करत एक जिवंत जागा तयार करावी लागते. 2022 मध्ये रिलीज झालेल्या कांतारा या सिनेमानं जगभरात सगळ्यांचं प्रेम आणि कौतुक मिळवलं. या चित्रपटाने 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभूतपूर्व विजय मिळवला. मनोरंजन  करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. आणि भारताच्या मध्यभागी असलेली एक विलक्षण कथा आणली. या कथेने देशाच्चा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची जगाला ओळख करून दिली. पण या सिनेमात दाखवण्यात आलेला भव्य दिव्य कदंब साम्राज्य सेटवर कसं उभारलं माहितीये?

मोठ्या पडद्यावर कदंब साम्राज्य उभे ठाकणार

कांतारा 1 हा एक अद्भुत अनुभव असल्याचे या सिनेमाचे निर्माते सांगतात. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते आणि त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे. 

80 फूट उंचीचा भव्य सेटही पुरेना

निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून अगदी चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी 80 फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना हवे ते साध्य होईना. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला.

कदंब साम्राज्याचे सौंदर्य प्रेक्षकांना खीळवणार !

कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जातो. कांतारा 1 या काळात सेट केला आहे. प्रीक्वल मधून चित्रपटाच्या विविध बाजू दिसणार आहेत.  निर्माते या युगाची पुनर्निर्मिती करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसून ते हा चित्रपट साकारण्यासाठी अनेक आव्हान स्वीकारत आहेत. त्यामुळे कांतारा पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही.

कांतारा 2 चित्रपटाबाबत मोठी अपडेट

कांतारा चित्रपटाच्या पुढील भागासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी त्यांच्या टीमसोबत गेल्या एक वर्षापासून वेगाने काम करत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा 2' चित्रपटाचं अर्धे शूटिंग पूर्ण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. 'कांतारा 2' चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. रिपोर्ट्सनुसार दावा करण्यात येत आहे की, चित्रपटाचं आउटडोअर शूटींग पूर्ण झालं आहे, आता फक्त 15 ते 20 दिवसांचं इनडोअर शूटिंग बाकी आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू झालं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Shilpa Shetty On Reservation Viral Post: 'लोकच आरक्षण संपवण्याची मागणी करतील...', शिल्पा शेट्टीच्या नावाने पोस्ट व्हायरल; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया ..
'लोकच आरक्षण संपवण्याची मागणी करतील...', शिल्पा शेट्टीच्या नावाने पोस्ट व्हायरल; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया ..
Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget