एक्स्प्लोर

Himanshu Jangra First Reaction On 370 Biryani controversy: '370 रु बिर्याणी' प्रकरणावर हिमांशू जांगडाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, प्रणितनेच मला...

राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला कॉमेडियन प्रणित मोरेसह बोलवल्यानंतर आता हिमांशू जांगडाने सगळ्या प्रकारावर मौन सोडलं आहे. 

Himanshu Jangra on Pranit More Show 370 Biryani Statement: गेल्या काही दिवसांपासून प्रणित मोरेच्या शोमधील हिमांशू जांगडा प्रचंड चर्चेत आहे. डेटवर घेऊन गेलेल्या महिलेला  370  रुपयांची बिर्याणी खाऊ घातली, नंतर घरी सोड म्हटल्यानंतर, '370 रु वसूल तर करावे लागतील ' असं म्हणत महलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगणाऱ्या या तरुणाच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडाला होता. महिलांविषयी असंवेदनशील आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हिमांशूला हे वक्तव्य व्हायरल झाल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. शिवाय, अनेक कायदेशीर नोटीसा आल्या.त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.  राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला कॉमेडियन प्रणित मोरेसह बोलवल्यानंतर आता हिमांशू जांगडाने सगळ्या प्रकारावर मौन सोडलं आहे. 

काय म्हणाला हिमांशू जांगडा ?

गुरुग्राममधील स्टारविक डिझाईन म्हणजे, ज्या कंपनीतून त्याला काढून टाकलं, त्यांच्या अकाउंटवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला ' सर आता माझी अवस्था खूप वाईट आहे. मी खूप तणावत आहे. आता जेव्हा मी माझ्या कुटुंबाला पाहतो, तेव्हा मला खूप पश्चाताप होतोय की, मी त्या शोमध्ये का गेलो.' ज्यांनी नोकरीवरून काढून टाकलं त्यांच्याशी बोलताना हिमांशूने नेमका काय प्रकार झाला हे सांगितले.

तो म्हणाला ' तुम्हाला माहीतच आहे की गेल्या दोन आठवड्यांपासून मला माझ्या instagram वर प्रचंड ट्रॉलिंगला सामोरे जावे लागत आहे. एक आठवड्यापर्यंत याबद्दल कोणालाच माहीत नव्हते.घरीही कोणाला याची कल्पना नव्हती,माझ्या मूळ गावीही कोणालाच याबद्दल माहीत नव्हते.पण गेल्या रविवारी माझ्या काकांना याबद्दल कळले. व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून त्याच्या काकांनी त्याला फोन करून हे काय चाललंय याचा स्पष्टीकरण मागितलं होतं.

हिमांशू म्हणाला' माझ्या काकांनी मला फोन करून विचारले की काय चालले आहे.मी त्यांना सर्व समजावून सांगितले. त्यांनी विचारले की 'तू या शोमध्ये का गेला होतास . ते मला ओरडले' पण पुढच्या दोन दिवसात मला यासाठी इतका द्वेष सहन करावा लागेल, असे मला अजिबात वाटले नव्हते. हा व्हिडिओ माझ्या नातेवाईकांकडे गेला. तो शेजाऱ्यांकडेही गेला.'हिमांशूने दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांनी त्याच्या घरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्या वक्तव्याबद्दल विचारणा केली होती. 

शेजारच्यांनी कुटुंबाकडे केली चौकशी

'शेजारचे माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना सांगितले की, त्यांचा मुलगा या व्हिडिओमध्ये आहे .आणि ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे .त्यानंतर माझ्या कुटुंबाला याबद्दल कळले.असेही हिमांशू म्हणाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी बोलवून जाब विचारला.पण नोकरी गेल्यानंतर त्याच्यावरील दबाव आणखी वाढला. इथपर्यंत सर्व ठीक होते.पण जेव्हा त्यांना कळले की मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, त्यावेळी तेही खूप तणावात आले. आता माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मला नोटीससुद्धा मिळाली आहे. ' असंही हिमांशूने सांगितलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Starvik Design (@starvik.design)

माझं वक्तव्य पूर्णपणे खरं नव्हतं ..

'खरंतर,मी या शोचा मूळ भाग या आधीही पाहिला होता.त्यामुळे गुडगावमध्ये हे पहिल्यांदाच घडत होते.हे बहुतेक करून मुंबईतच केलं जातं.मी विचार केला की, एकदा जाऊन बघूया कसं आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या कॉमेडी शोला गेलो होतो. मी ज्या मुलीबद्दल बोलत आहे, अशाच एका मुलीला मी डेट केले होते.आमचं चांगलं बोलणं झालं आणि आम्ही बऱ्याच वेळ एकत्र घालवला.पण मी तिथे जे बोललो ते पूर्णपणे खरं नव्हतं.मी ऐनवेळी बोललो. ते केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने बोललो.मी मान्य करतो की मी तिथे काही चुकीचे शब्द वापरले.मला यासाठी माफी मागायची आहे. 'असे हिमांशू जांगडा म्हणाला.

'मी तिथे जे काही बोललो ते केवळ मनोरंजन करण्याचे उद्देशाने बोललो .माझा तसा कोणताही हेतू नाही,माझी तशी मानसिकता नाही.सर तुम्हाला माहित आहे की, मी तुमच्यासोबत काम केलं आहे,आमच्या ऑफिसमध्ये अनेक महिला सहकारी आहेत आणि आजपर्यंत त्यांची माझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.त्या शोमध्ये जे काही घडलं,तिथलं वातावरणच असं होतं की लोक त्याकडे मनोरंजकपणे पाहत होते.

प्रणित मोरेने मला प्रोत्साहित केलं..

सूत्रसंचालक  प्रणित मोरेही ते मनोरंजकपणे घेत होता.त्या सगळ्यांचा आत्मविश्वास पाहून मला प्रोत्साहन मिळालं आणि मी त्यात आणखी थोडी भर घातली, असं तो म्हणाला.जेव्हा विरोध वाढत गेला, तेव्हा त्याने माफी मागितली आणि अखेरीस आपले सोशल मीडिया खाते बंद करून टाकलं. ' असंही हिमांशुने सांगितलं .

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget