एक्स्प्लोर

कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण, हायकोर्टानं निकाल राखून ठेवला

कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामध्ये न्यायालयानं खटल्याची कारवाई सुरू केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई योग्य आहे. असा दावा लेखर आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर कंगनानं मात्र ही कारवाई बेदाकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. कंगनाच्या यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे.

कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामध्ये न्यायालयानं खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली असून दंडाधिकारी कोर्टानं नियमबाह्य पध्दतीनं ही कारवाई केल्याचा आरोप कंगनानं या याचिकेतून केला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. अख्तर यांच्यावतीने अॅड. जे भारद्वाज यांनी पुरवणी प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर सादर केलं. ज्यात दंडाधिकारी न्यायालयानं याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचं पूर्ण पालन करण्यात आलं आहे आहे, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. मात्र निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून 9 सप्टेंबर रोजी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

कंगनाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयानं याची दखल घेत जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे की अख्तर यांच्या या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले आहे. अंधेरी न्यायालयात यावर 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Embed widget