Heyy Babyy cute child : अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये असलेला 'हे बेबी' हा चित्रपट  2007 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. या चित्रपटाने  एकीकडे प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवलं, तर दुसरीकडे काही प्रसंगांमध्ये भावनिक क्षणही निर्माण केले. साजिद खान दिग्दर्शित ही फिल्म अमेरिकन चित्रपट 'थ्री मॅन अ‍ॅन्ड ए बेबी'वर आधारित होती आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. तिघाही लीड अभिनेत्यांव्यतिरीक्त, या चित्रपटात एक गोंडस छोटी मुलगीही होती, जिने लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात 'एंजेल' ही गोंडस भूमिका जुआना सांघवी हिने साकारली होती. आता, चित्रपटाला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जुआनाचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते भावूकही होत आहेत आणि आनंदीही. (Heyy Babyy cute child)

Continues below advertisement



'हे बेबी' मधून जुआनाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतंच, शिवाय चित्रपटातील कलाकारही तिच्या प्रेमळ स्वभावाने प्रभावित झाले होते. जानेवारी 2022 मध्ये फरदीन खानने 'हे बेबी' मधील एक बीटीएस (बिहाइंड द सीन) फोटो शेअर केला होता. त्या ट्विटमध्ये त्याने लिहिलं होतं की, लहान जुआनासोबत सीन करायचा असल्यामुळे त्याने धूम्रपान (smoking) सोडलं होतं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर केवळ प्रेक्षकच नव्हे तर समीक्षकही तिच्या क्यूटनेसवर फिदा झाले होते.  (Heyy Babyy cute child)


अलीकडेच जुआनाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता 21 वर्षांची झालेली जुआना या फोटोंमध्ये ओळखूही येत नाही इतकी बदललेली आहे. तिचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी ती पुन्हा चित्रपटसृष्टीत यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. (Heyy Babyy cute child)


'हे बेबी'मुळे जुआना सांघवीला संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळाली. चित्रपट यशस्वी ठरल्यावरही जुआना नंतर कधीच कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र, अनेक वर्षांनंतर जुआनाचे काही फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. अलीकडेच ती मुंबईतील एका नाइट क्लबमध्ये मजा करताना दिसली. (Heyy Babyy cute child)


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Shilpa Shirodkar Shocked To Hear News Of Her Own Death: 'शिल्पा शिरोडकरची गोळी घालून हत्या...'; स्वतःच्याच मृत्यूची बातमी आली अन् दिग्गज अभिनेत्रीच्या पायाखालची जमिनच हादरली


Khushi Mukherjee Photoshoot: अंगावर एकही कपडा नाही, फक्त काळी मखमली शाल; प्रसिद्ध अभिनेत्रीचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल