Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
हेमंत ढोमे सोशल मीडियावर अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घटनांवर व्यक्त होत असतो. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तो सातत्याने त्याचा सोशल मीडियावर मत मांडताना दिसला.

Hemant Dhome:नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी पुकारलेल्या कॉकरोच जनता पार्टीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला एक पाऊल मागे यावं लागलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय. दिल्लीतील जंतरमंतरवर छेडलेल्या आंदोलनाला देशभरातील तमाम नागरिकांकडून, विद्यार्थ्यांकडून, मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांकडून पाठिंबा मिळाला. मराठी कलाकारांपैकी सुमित राघवनसह चिन्मयी सुमित, हेमंत ढोमे, अतुल कुलकर्णी अशा अनेक सेलिब्रिटींनी कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाला हेमंत ढोमे?
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनामे नंतर हेमंत ढोमे ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पोस्टचा जोडत हेमंत म्हणाला,' मेरे युवा साथीयो! आता सुरुवात झालीय.. आता मागे हटायचं नाही! अभिनंदन # लोकशाही # राजीनामा # CJP _2029
मेरे युवा साथिंयो!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) July 25, 2026
आता सुरूवात झालीय…
आता मागे हटायचं नाही!
अभिनंदन! 🫡#लोकशाही #राजीनामा @CJP_2029 https://t.co/Wn8wjgJafn
हेमंत ढोमे सोशल मीडियावर अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घटनांवर व्यक्त होत असतो. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तो सातत्याने त्याचा सोशल मीडियावर मत मांडताना दिसला.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले होते. देशातील तरुणाईने या आंदोलनातून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर ही परिस्थिती आणखीनच संवेदनशील झाली होती. अखेर, आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा समोर येताच देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















