एक्स्प्लोर

Hema Malini On Her Biopic: ना ईशा देओल, ना आलिया भट्ट; हेमा मालिनी यांच्या बायोपिकमध्ये कोण झळकणार? 1000 कोटींच्या 3 सुपरहिट फिल्म्स देणारी 'ही' लेडी सुपरस्टार

Hema Malini On Her Biopic: ना ईशा देओल, ना आलिया भट्ट; स्वतःच्या बायोपिकसाठी हेमा मालिनी यांची पसंती बॉलिवूडच्या 'या' लेडी सुपरस्टारला, आजवर दिल्यात 1000 कोटींच्या 3 सुपरहिट फिल्म्स

Hema Malini On Her Biopic: 'ड्रीम गर्ल' (Dream Girl) हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा कधी बनला, तर त्यांची भूमिका कोण साकारेल? हा प्रश्न अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनात होता. आता खुद्द हेमा मालिनी (Bollywood Actress Hema Malini) यांनीच या उत्सुकतेचा किंवा संभ्रमाचा अंत केलाय. त्यांनी अशा एका अभिनेत्रीचं नाव घेतलंय, जे ऐकून नेटकऱ्यांचंही असंच म्हणणं आहे की, या भूमिकेसाठी तिच सर्वोत्तम निवड असून तिच्यापेक्षा इतर कुणीच या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही. आपल्या 60 वर्षांच्या कारकि‍र्दीचा आढावा घेताना हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलंय की, जर त्यांच्यावर बायोपिक बनलाच, तर त्यात दीपिका पदुकोणनं मुख्य भूमिका साकारलेली त्यांना आवडेल.

हेमा मालिनी यांनी दीपिकाचंच नाव का घेतलं? (Hema Malini Chooes Actress For Her Biopic)

एका विशेष कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना त्यांच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आले, हेमा मालिनी यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता दीपिका पदुकोणचं नाव घेतलं. हेमा म्हणाल्या की, दीपिकाची इच्छा असल्यास ती ही भूमिका साकारू शकते. दीपिकाचं कौतुक करताना त्यांनी तिला सुंदर आणि प्रतिभावान म्हटलंय, तसेच ती या पात्राला नक्कीच न्याय देऊ शकेल, असंही नमूद केलंय. हेमा यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

हेमा मालिनी आणि दीपिका पादुकोन यांच्यात खास कनेक्शन (Hema Malini Deepika Padukone Special Connection)

हेमा मालिनी आणि दीपिका पादुकोन यांच्यातलं सख्य काही कुणापासून लपलेलं नाही. 2017 मध्ये जेव्हा हेमा मालिनी यांची बायोग्राफी लॉन्च करण्यात आलेली, त्यावेळी त्यांनी दीपिका पादुकोनला यासाठी निवडलेलं. एवढंच नाहीतर, दीपिकाचा पहिला सिनेमा 'ओम शांति ओम'मधली तिची 'शांतिप्रिया' ही भूमिका हेमा मालिनी यांच्या स्टार इमेजशी इंस्पायर्ड होती. अशातच जर हा बायोपिक कधीही बनला, तर दीपिकाचं नाव चाहत्यांसाठी अजिबातच धक्कादायक ठरणार नाही. 


Hema Malini On Her Biopic: ना ईशा देओल, ना आलिया भट्ट; हेमा मालिनी यांच्या बायोपिकमध्ये कोण झळकणार? 1000 कोटींच्या 3 सुपरहिट फिल्म्स देणारी 'ही' लेडी सुपरस्टार

60 वर्षांच्या प्रवासातलं सर्वात मोठं वक्तव्य 

हेमा मालिनी यांनी आपल्या 60 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमात बोलताना स्वतःच्या बायोपिकसाठी दीपिका पादुकोनचं नाव घेतलं. या प्रसंगी हेमा मालिनी यांनी आपल्या आईची, जया चक्रवर्ती यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली आणि प्रत्येक कठीण प्रसंगी त्या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्याचं नमूद केलं. कुटुंबाचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र, काही कारणांमुळे त्यांची मुलगी ईशा देओल या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. 

दरम्यान, हेमा मालिनी यांनी स्वतःच्या बायोपिकसाठी दीपिका पादुकोनचं नाव घेतल्यामुळे नेटकरीही खूश आहेत. दीपिकाच हेमा मालिनी यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकते, असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. दीपिका पदुकोणनं 'पठाण', 'जवान' आणि 'कल्की' यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमांस', सलमान-शाहरुखपेक्षाही खतरनाक स्वॅग, परवानगीशिवाय रेखाला केलेलं किस, अख्खी इंडस्ट्री हादरलेली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Embed widget