एक्स्प्लोर

Harry Potter Web Series Teaser Out: हॉगवर्ट्सचे जादूचे दरवाजे पुन्हा उघडणार; हॅरी पॉटरचं स्वप्नातलं विश्व पुन्हा रुपेरी पडद्यावर अवतरणार, टीझर रिलीज

टीझर  समोर येताच फॅन्समध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय डायगन अ‍ॅली आणि हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझर्ड्र पुन्हा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Harry Potter Web Series Teaser Out: हॅरी पॉटरच्या जादुई विश्वात जगभरातील चाहत्यांना पुन्हा एकदा जाण्याची संधी मिळणार आहे. जे. के. रॉलिंग यांनी निर्माण केलेल्या या लोकप्रिय फँटसी जगाने पुस्तकांपासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रचंड यश मिळवलं. Warner Bros. Pictures च्या 8 सुपरहिट चित्रपटांनंतर आता हाच जादुई प्रवास नव्या वेब सिरीजमधून पुन्हा सुरू होणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात घर केलेल्या या कथेची जादू अजूनही कायम आहे.

दीर्घ प्रतीक्षेनंतर HBO ने ‘हॅरी पॉटर’ सिरीजचा टीझर रिलीज केला आहे. लंडनमधील खास कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली होती. या सिरीजचा पहिला सीझन  'हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन' या पुस्तकावर आधारित असून, 2026 च्या ख्रिसमसला जागतिक स्तरावर रिलीज होणार आहे. टीझर  समोर येताच फॅन्समध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय डायगन अ‍ॅली आणि हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझर्ड्र पुन्हा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काय आहे सिरीजची कथा? ( Harry Potter)

2011 मध्ये Harry Potter and the Deathly Hallows- Part 2 सोबत चित्रपटमालिकेचा शेवट झाला होता. आता HBO ही कथा नव्या वेब सिरीजच्या रूपात अधिक विस्ताराने मांडणार आहे. मूळ पुस्तकाप्रमाणेच कथा हॅरी पॉटरच्या पहिल्या वर्षापासून सुरू होते.एक साधा मुलगा जादूगार असल्याचं सत्य कसं उलगडतं आणि त्याचा हॉगवर्ट्समधील प्रवास कसा घडतो, हे सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

टीझरमध्ये काय खास?

टीझर अगदी ओळखीच्या पद्धतीने सुरू होतो हॅरीला त्याची आंटी कमी लेखते, पण अचानक त्याला हॉगवर्ट्सचं पत्र मिळतं. त्यानंतर त्याची हॅगरिड सोबत भेट होते. यानंतर नॉस्टॅल्जिया देणारे सीन प्लॅटफॉर्म 9¾, हारमायनी आणि रॉन सोबतची पहिली भेट पाहायला मिळतात. एका भावनिक सीनमध्ये हॅग्रिड हॅरीला त्याच्या आई-वडिलांबद्दल सांगतो. तर Garrick Ollivander हॅरीच्या शक्तीबद्दल मोठ्या अपेक्षा व्यक्त करताना दिसतो.

फॅन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया, अभिनेत्याला धमक्या

टीझरला सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींना कास्टिंगबद्दल नाराजी आहे.विशेषतः ॲडम ड्राइव्हरला स्नेपच्या भूमिकेसाठी न घेतल्याबद्दल चर्चा रंगली आहे. या सिरीजमध्ये सेव्हरस स्नेपची भूमिका Paapa Essiedu साकारत आहेत. मात्र, त्यांना सोशल मीडियावरून धमक्या मिळाल्याचंही त्यांनी उघड केलं आहे.काही मेसेजेसमध्ये थेट जीव घेण्याच्या धमक्या दिल्याचं समोर आलं. सिरीजच्या सेट्सचंही जोरदार कौतुक होत आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं “हे सगळं ओळखीचं आहे, पण तरीही काहीतरी नवीन वाटतंय.” त्यामुळे ही सिरीज फक्त रिमेक नसून एक फ्रेश अनुभव देणार, असं दिसतंय.

सिरीजची कास्ट कशी असेल?

हॅरी पॉटर फॅन्समध्ये नव्या व्हर्जनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. ही ओळखीची कथा नव्या अंदाजात कशी सादर होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निर्मात्यांनी काही महत्त्वाच्या कलाकारांची घोषणा केली आहे. हर्मायनी ग्रिंजलच्या भूमिकेत अरेबेला स्टँटन दिसणार आहे, तर अल्बस डंबलडोर यांच्या भूमिकेत जॉन लिथगो झळकणार आहेत.

OTT रिलीज कधी?

‘हॅरी पॉटर’ ही लाईव्ह-अ‍ॅक्शन सिरीज 2026 च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे. भारतात ती HBO Max वर पाहता येण्याची शक्यता आहे. तसेच JioHotstar वरही ती उपलब्ध होऊ शकते. एकंदरीत, हॉगवर्ट्सची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार असल्यामुळे फॅन्समध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे!

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget