Hanuman Cinema and Ram Mandir : प्रशांत वर्माने (Prashant Varma) दिग्दर्शित केलेला हनुमान (Hanuman) हा सिनेमा 12 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेजा सज्जा, वरलक्ष्मी सरथकुमार, अमृता अय्यर आणि विनय राय या सर्वांनी या सिनेमात काम केले होते. हनुमान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. निर्मात्यांनी राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) प्रत्येक तिकिटावर 5 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची निर्मात्यांनी अंमलबजावणी केली आहे. हनुमानच्या (Hanuman) टीमने अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरासाठी 2,66,41,055 रुपयांचे दान केले आहेत. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. 






सिनेमाची जगभरातील कामगिरी एकूण 150 कोटींवर पोहोचली आहे. शिवाय, या शनिवार आणि रविवारीही सिनेमा तुफान कमाई करताना दिसत आहे. हनुमानने दुसऱ्या आठवड्यात देश आणि विदेशात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू, राजकीय नेते आणि दिग्गज लोक उपस्थित असणार आहेत. रजनीकांत, धनुष, चिरंजीवी, राम चरण, अक्षय कुमार, आलिया भट, रणबीर कपूर, कंगणा राणावत, जॅकी श्रॉफ, अनुष्का शर्मा हे बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. 


याशिवाय, अभिनेता महेश बाबू आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे व्यक्तीगत कामांमुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेने रजनीकांत आणइ धनुष अयोध्येत पोहोचले, असल्याची माहिती दिली आहे. सिनेमाबाबत बोलायचे झाले तर हनुमान सध्या चित्रपटगृहांत लोकप्रिय ठरत आहे. हनुमंथू नावाच्या युवकाची कहानी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. तो आपल्या गावातील कुलदैवतेसमोर आल्यानंतर महाशक्ती मिळवतो. त्यानंतर तो बहिण आणि प्रियसीच्या मतदीने खलनायक असलेल्या विनयच्या विरोधात आपल्या लोकांना जागृत करतो. हा सिनेमाची स्टोरी आहे. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala : सुशांत सिंह राजपूत आजही चाहत्यांच्या मनात जिवंत ते 'आर्टिकल 370'चा टीझर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या