SAIL Recruitment 2024 : नोकरीची संधी (Job Vacancy News) कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (Steel Authority of India Limited) नोकरीची संधी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी केला आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकता. याभरती अंतर्गत 40 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिक तपशील जाणून घ्या.


नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याभरतीअंतर्गत एकूण 46 पदांवर बरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना sail.ucanapply.com या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करावा लागेल.


SAIL Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा


ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू (Application Start Date) : 9 जानेवारी 2024


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Deadline) : 30 जानेवारी 2024


SAIL मध्ये भरती सुरु


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या अधिसूचनेनुसार, संस्थेमध्ये परिचर आणि ऑपरेटरची पदे भरली जातील. या मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट sail.ucanapply.com ला भेट द्यावी लागेल. मात्र या मोहिमेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांनी तातडीने अर्ज करावेत. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. शेवटची तारीख संपल्यानंतर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. उमेदवार खाली दिलेल्या चरणांद्वारे देखील अर्ज करू शकतात.


SAIL Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील


या मोहिमेद्वारे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एकूण 46 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये परिचर आणि ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. पात्रतेशी संबंधित माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.


SAIL Recruitment 2024 : निवड प्रक्रिया कशी असेल?


या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT) द्यावी लागेल. CBT परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी किंवा व्यापार चाचणीसाठी बोलावले जाईल. यानंतर गुणवत्ता यादी, संगणक आधारित चाचणी (CBT) मधील कौशल्य चाचणीमधील गुणांवर आधारित असेल. या निवड झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना पाहू शकतात.


SAIL Recruitment 2024 : अर्ज कसा दाखल करायचा ?



  • अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला सर्वात आधी sail.co.in वेबसाईटवर जावं लागेल.

  • यानंतर उमेदवाराला अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर लिंकवर क्लिक करावं लागेल.

  • आता उमेदवाराला भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करावं लागेल.

  • यानंतर उमेदवाराला नोंदणी लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.

  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना लॉगिन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • त्यानंतर उमेदवारांना अर्ज फी भरावी लागेल.

  • यानंतर उमेदवाराने फॉर्म सबमिट करावा.

  • त्यानंतर शेवटी उमेदवार अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट घेऊ शकतात.