एक्स्प्लोर

Hanuman Ansh Box Office Collection:बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता होता पलटला 'या' लो बजेट फिल्मचा गेम; लोक चपला काढून पाहतायत सिनेमा, तिसऱ्या आठवड्यातलं कलेक्शनने सगळेच चक्रावले

विशेष म्हणजे, साधारणपणे रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सिनेमांच्या कमाईत घट पाहायला मिळते. मात्र, या सिनेमाच्या बाबतीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं.

Hanuman Ansh Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर कधी काय घडेल याचे अंदाज असले तरी काही सिनेमे अंदाजांचे ठोकताळे मोडून काढतात आणि इतिहास रचतात. चार आठवड्यापूर्वी  प्रदर्शित झालेल्या हनुमान अंश या सिनेमाने असं काही करून दाखवलं आहे, जे सिनेमाच्या इतिहासात दीर्घकाळ लक्षात ठेवलं जाईल. ज्या सिनेमासाठी सुरुवातीचे तीन आठवडे थिएटरमध्ये प्रेक्षक फिरकत नव्हते, त्याच सिनेमाची रिलीजच्या चौथ्या आठवड्यात तिकीटं मिळणं कठीण झालं आहे. ‘हनुमान अंश’ने (Hanuman Ansh) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) एवढी कशी कमी केली? की फ्लॉप म्हणता म्हणता हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरतोय? पाहूया.

‘हनुमान अंश’ने कसा रचला इतिहास?

‘हनुमान अंश’ मोठ्या पडद्यावर 31 जुलै 2026 रोजी  प्रदर्शित झाला. सुरुवातीला या सिनेमाला मोजक्याच स्क्रीन्स मिळाल्या. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्या या सिनेमाला पहिल्या दोन आठवड्यांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, सिनेमाचा खरा खेळ तिसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला. ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिस कमाई लाखांमधून थेट कोटींच्या घरात पोहोचली. विशेष म्हणजे, साधारणपणे रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सिनेमांच्या कमाईत घट पाहायला मिळते. मात्र, ‘हनुमान अंश’च्या बाबतीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. दुसऱ्या आठवड्यानंतर सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली.

नफ्याच्या बाबतीतही ‘हनुमान अंश’ अव्वल

‘हनुमान अंश’चं बजेट अवघं 2 कोटी रुपये आहे. तर सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल 46 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच या सिनेमाने आपल्या बजेटच्या तब्बल 23 पट अधिक कमाई केली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केलेली ही कमाई निश्चितच लक्षवेधी ठरली आहे. या सिनेमाचं भारतामधील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹58.70 कोटींवर पोहोचलं आहे. लोक अक्षरशः गळ्यात भगवे स्कार्फ घालून चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. चपला काढून सिनेमा पाहत आहेत. सोशल मिडीयावर या बाबतीत अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

 

कशावर आधारित आहे ‘हनुमान अंश’ची कथा?

‘हनुमान अंश’ची कथा नीब करोरी बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. सप्टेंबर 1973 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. उत्तराखंडमधील नैनीताल येथे आजही त्यांच्या नावाने आश्रम आहे. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती नीब करोरी बाबा यांचे अनुयायी असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या विचारांनी आणि शिकवणीने प्रेरित झालेल्या या व्यक्तींमुळेही त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. कोणत्याही मोठ्या स्टारकास्ट किंवा गाजावाजाशिवाय प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ने सोशल मीडियाच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर घेतलेली झेप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा:‘Toxic’ आणि ‘ आवारापन 2’च्या शर्यतीत 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने मारली बाजी! 800% नफा कमवत ठरला ब्लॉकबस्टर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget