Hansika Motwani Wedding : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आणि सोहेल कथुरिया हे आज लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील प्रथेनुसार हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. या जोडप्याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हंसिका तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिकाचा मेहंदी सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी शनिवारी संगीत महोत्सवाबरोबरच रिंग सेरेमनीचा कार्यक्रम पारपडला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे कपल एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. जेव्हा सोहेलने हंसिकाला गुडघ्यावर बसून अंगठी घालायला दिली तेव्हा सर्वजण जल्लोष करताना दिसले.
हंसिकाने सुंदर गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे. तर, सोहेल शेरवानीत सुंदर दिसत आहे. हंसिकाने डायमंड ज्वेलरीसह सुंदर लेहेंगा कॅरी केला होता. संगीत सोहळ्यात हंसिका नाचतानाही दिसली. दोघांचा कपल डान्स चाहत्यांना खूप आवडला.
हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 'शक लाका बूम बूम', 'सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे. या मालिकांच्या माध्यमातून हंसिका घराघरांत पोहोचली आहे. 'कोई मिल गया', 'आपका सरूर' आणि 'मनी है तो हनी' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
महत्वाच्या बातम्या :
Hansika : हंसिका मोटवानी अडकणार लग्नबंधनात; 450 वर्ष जुन्या किल्ल्यात घेणार सात फेरे